गर्लफ्रेंड तमन्ना भाटियाच्या या सवयीमुळे विजय वर्मा होतो नाराज; अभिनेत्याने केला खुलासा, म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2023 07:16 PM2023-06-22T19:16:59+5:302023-06-22T19:17:34+5:30
Tamannah Bhatia And Vijay Varma : तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा गेल्या काही दिवसांपासून एकमेकांना डेट करत असल्यामुळे चर्चेत आहेत.
'बाहुबली' फेम अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamannah Bhatia) आणि 'डार्लिंग्स' फेम अभिनेता विजय वर्मा (Vijay Varma) हे सध्या बी-टाऊनमधील सर्वात चर्चेत असलेल्या कपल्सपैकी एक आहेत. विजय आणि तमन्ना यांच्या डेटिंगच्या चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू होत्या, मात्र या वृत्ताला स्वतः या जोडप्यांनी दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले की दोघेही एकमेकांच्या प्रेमात आहेत. विजय आणि तमन्ना आता त्यांच्या नात्याबद्दल उघडपणे बोलतात. अलीकडेच, अभिनेता विजय वर्माने त्याला तमन्नाची कोणती सवय नाही आवडत याबद्दल सांगितले.
टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत, विजयला विचारण्यात आले की तमन्नाची कोणती सवय तुला अजिबात आवडत नाही? या प्रश्नाच्या उत्तरात विजयने स्पष्टपणे सांगितले की, 'तिला वर्कआउटचे जास्त वेड आहे. ती वर्कआऊट्सनुसार तिच्या दिवसाचे नियोजन करते. जिममध्ये गेल्यामुळे तिची झोपही पूर्ण होत नाही, मी तिला सांगतो की चांगल्या जीवनशैलीसाठी तुमची झोप पूर्ण करणे खूप आवश्यक आहे, परंतु ती फक्त ४ तास झोपेल आणि नंतर जिममध्ये जाईल.
तमन्ना विजयला त्रास देण्यासाठी लढवते नवीन शक्कल
विजय वर्माच्या या खुलाशानंतर तमन्नाने तिच्या स्पष्टीकरणात सांगितले की ती खूप खाते, त्यामुळे ती वर्कआऊट चुकवू शकत नाही. यानंतर जेव्हा तमन्नाला विचारण्यात आले की विजयची कोणती सवय आहे जी तिला अजिबात आवडत नाही, तेव्हा अभिनेत्रीने सांगितले की, अशी कोणतीच गोष्ट नाही. मात्र त्याला त्रास देण्यासाठी नवीन नवीन शक्कल लढवत असते.
विजय शांततेची मूर्ती आहे
तमन्ना भाटिया म्हणाली की, 'खरं आहे की मी त्याला त्रास देण्यासाठी आयडियाचा विचार करत राहते. पण तो खूप शांत स्वभावाचा आहेत. त्यांच्या चित्रपटातील भूमिकांकडे जाऊ नका, तो शांततेची मूर्ती आहेत. वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, तमन्ना आणि विजय लवकरच नेटफ्लिक्सची नवीन वेबसीरिज 'लस्ट स्टोरी २' मध्ये दिसणार आहे.