शेवटचे या चित्रपटात पाहायला मिळणार दिवंगत अभिनेते विजू खोटे, जाणून घ्या याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2020 06:01 PM2020-02-24T18:01:44+5:302020-02-24T18:02:25+5:30

हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीतले दिवंगत अभिनेते विजू खोटे शेवटचे या चित्रपटात पहायला मिळणार आहेत.

Viju Khote will be seen in Kamayab Movie, This is last movie of him | शेवटचे या चित्रपटात पाहायला मिळणार दिवंगत अभिनेते विजू खोटे, जाणून घ्या याबद्दल

शेवटचे या चित्रपटात पाहायला मिळणार दिवंगत अभिनेते विजू खोटे, जाणून घ्या याबद्दल

googlenewsNext

रेड चिलीज एण्टरटेन्मेंट द्वारे प्रस्तुत दृश्यम फिल्म्स प्रोडक्शनचा आगामी चित्रपट कामयाबमध्ये बॉलिवूडमधील अभिनेत्याची कडू गोड कथा सादर करण्यात आली आहे. हा चित्रपट अनेक गोष्टीसाठी महत्त्वाचा आहे. या चित्रपटाद्वारे चरित्र अभिनेत्यांची कहाणी लोकांसमोर येईल, त्यासोबतच मराठी हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने स्वत: ठसा उमटवणारे दिवंगत अभिनेते विजु खोटे यांचादेखील हा शेवटचा चित्रपट होता.   

शोले चित्रपटातील कालिया ते अंदाज़ अपना अपना मधील रॉबर्ट हिंदी चित्रपटांमधील अशा त्यांच्या अनेक भूमिकांनी मराठी सोबतच अमराठी रसिकांवर देखील आपली अमीट अशी छाप सोडली आहे. बॉलीवुड मध्ये अभिनेता विजु खोटे एक महत्त्वाचे नाव होते. शोले, अंदाज़ अपना अपना सोबत खिलाडी ४२०, नागिन, अजब प्रेम की गजब कहानी, गोलमाल ३ सारख्या जवळपास ४०० हून अधिक चित्रपटामध्ये अभिनय केला आहे. 

"कामयाब" चित्रपटाचे दिग्दर्शक हार्दिक मेहता म्हणाले की, विजु सरंसोबत काम करण्याची माझी खूप दिवसांपासूनची इच्छा होती. कामयाब हा चित्रपट ही चरित्र अभिनेत्यांची कहाणी आहे आणि या चित्रपटासाठी अभिनेता विजु खोटे यांनी आम्हाला खूप माहिती पुरवली होती. आम्ही हा चित्रपट त्यांना समर्पित करत असून चित्रपटाच्या सुरुवातीला त्यांचा फोटो आणि त्यांना आदरांजली वाहिली आहे. आजही लोक त्यांना कालिया म्हणूनच ओळखतात. ते मला म्हणायचे की, अजुनही अनेक लोक मला कालिया नावानेच हाक मारतात. ही माझ्यासाठी विनोद आणि ट्रॅजिक मिश्रित गोष्ट आहे.   

गौरी खान, मनीष मुंद्रा आणि गौरव वर्मा द्वारे निर्मित 'कामयाब' ६ मार्च २०२० ला प्रदर्शित होत आहे.

Web Title: Viju Khote will be seen in Kamayab Movie, This is last movie of him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.