जिंकलस भावा! सोनू सूदच्या ‘ब्रिगेड’मध्ये सामील झाला विकास खन्ना, हजारो मजुरांची भागवतोय भूक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2020 12:30 PM2020-05-29T12:30:01+5:302020-05-29T12:31:43+5:30
आता सोनूसोबत सुप्रसिद्ध शेफ विकास खन्ना हाही मजुरांच्या मदतीसाठी धावून आला आहे.
लॉकडाऊन काळात अभिनेता सोनू सूद लोकांचा हिरो ठरला आहे. ठिकठिकाणी अडकून पडलेल्या मजुरांना सोनूने मदतीचा हात दिला. हजारो मजुरांना सुरक्षित आपल्या घरी पोहोचवले. तूर्तास सोनूच्या कामाचा आवाका पाहून प्रत्येक जण त्याचे कौतुक करतोय. केवळ इतकेच नाही तर त्याच्या खांद्याला खांदा लावत मदतीसाठी मैदानातही उतरले आहेत. आता सोनूसोबत सुप्रसिद्ध शेफ विकास खन्ना हाही मजुरांच्या मदतीसाठी धावून आला आहे. होय, सोनू सूदने मजुरांसाठी बसगाड्यांची व्यवस्था केली आणि आता विकास खन्ना या मजुरांना पौष्टिक आणि स्वादिष्ट जेवण पुरवतोय.
As my brother @SonuSood is getting hundreds of people home, we are making sure that they are well fed. #FeedIndia
— Vikas Khanna (@TheVikasKhanna) May 27, 2020
Thank you @NDRFHQ@satyaprad1 and The Heroes of National Disaster Response Force for helping us feed 7 millions+ meals all over India. pic.twitter.com/y38kPRjWpL
विकास खन्नाने स्वत: ट्विट करून ही माहिती दिली. ‘माझा भाऊ सोनू सूद शेकडो मजुरांना घरी पोहोचवतोय. आम्ही या मजुरांच्या जेवणाची व्यवस्था बघतोय. या प्रवासात एकही मजूर भुकेला राहू नये, याची काळजी आम्ही घेतोय’ असे त्याने लिहिले.
काही दिवसांपूर्वी विकास खन्नाने सोनू सुदच्या मदत कार्याचे कौतुक करत, त्याला आगळेवेगळे ट्रिब्यूट दिले होते. सोनू सूदसाठी विकासने एक खास डिश बनवली होती. विशेष म्हणजे, या डिशला त्याने सोनूच्या जन्मगावावरून ‘मोगा’ हे नाव दिले होते. सोनू सूद ही डिश पाहून भलताच खूश झाला होता.
विकास खन्ना हा भारताचा नामवंत शेफ आहे. तो टीव्ही शो मास्टर शेफचा जज म्हणूनही दिसला होता. सोबत तो एक निर्माताही आहे.
लॉकडाऊन काळात विकास खन्ना अनाथआश्रम, वृद्धाश्रम अशा अनेकठिकाणी एप्रिलपासून जेवणाची व्यवस्था बघतोय.