विकास वर्मा बनला ट्रक ड्राइव्हर, जाणून घ्या याबद्दल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 07:25 PM2019-03-25T19:25:17+5:302019-03-25T19:26:56+5:30
विकास वर्मा चित्रपट मॉम आणि नाटक चंद्रगुप्त मौर्य व पोरस यामधील त्याच्या सर्वोत्तम अभिनयासाठी लोकप्रिय आहे.
ऑल्ट बालाजीचा शो 'गंदी बात'चे दुसरे पर्व त्याच्या साहसी, उत्स्फूर्तपूर्ण व उत्साही अवतारासह खूपच हिट ठरले. मोहक प्रेमकथांसह उत्स्फूर्त व साहसी सीन्सनी प्रेक्षकांना खिळवून ठेवले. सादरीकरणाच्या दिवशीच अनपेक्षित व्ह्यूज मिळालेल्या या रोमांचक कथांचे दुसरे पर्व त्याच्या वेगळ्या व मोहक आशयासह खूपच चर्चेत आले. मिळालेल्या भव्य प्रतिसादामुळे व्यासपीठाने गंदी बातचा आणखी एक खास थक्क करणारा एपिसोड सादर करण्याचे ठरवले आहे.
या नवीन उत्स्फूर्तपूर्ण एपिसोडमध्ये प्रमुख भूमिकेत धडाकेबाज विकास वर्मा दिसणार आहे. विकास वर्मा चित्रपट मॉम आणि नाटक चंद्रगुप्त मौर्य व पोरस यामधील त्याच्या सर्वोत्तम अभिनयासाठी लोकप्रिय आहे. या प्रसिद्ध अभिनेता व मॉडेलची निवड करत ऑल्ट बालाजी प्रेक्षकांना त्याच्या भूमिकेच्या माध्यमातून अचंबित करणार आहे.
पंजाबमधील ३० वर्षांचा ट्रक ड्रायव्हर किशन सिंग संधूची कथा आहे. याबद्दल विकास म्हणाला, 'मी प्रथमच गंदी बातच्या खास एपिसोडमध्ये ट्रक ड्रायव्हरची भूमिका साकारत आहे. मी पहिल्यांदाच पंजाबी भूमिका साकारत आहे. मी शूटिंगसाठी ट्रक चालवण्याचे प्रशिक्षण घेतले. मला ही भूमिका खूपच आव्हानात्मक वाटली. मला वाटते मी या भूमिकेसाठी माझा सर्वोत्तम अभिनय दिला आहे. माझी भूमिका किशन हा एक कॅसनोवा ट्रक ड्रायव्हर आहे. त्याने अनेक शहरांमध्ये प्रवास करत असताना अनेक महिलांचा गैरवापर केला आहे. पण शेवटी तो जाळ्यात सापडतो आणि कर्म त्याचे फळ त्याला देते. ऑल्ट बालाजीसह जुडण्याचा आनंद होत आहे.'