विकी कौशलचा आगामी चित्रपट 'उरी - द सर्जिकल स्ट्राइक'चा फर्स्ट लूक रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2018 12:25 PM2018-09-28T12:25:23+5:302018-09-28T12:27:12+5:30

विकी कौशल 'उरी - द सर्जिकल स्ट्राइक' सिनेमाचा पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा चित्रपट ११ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.

Viki Kaushal's upcoming film 'Uri - The Surgical Strike', First Look Released | विकी कौशलचा आगामी चित्रपट 'उरी - द सर्जिकल स्ट्राइक'चा फर्स्ट लूक रिलीज

विकी कौशलचा आगामी चित्रपट 'उरी - द सर्जिकल स्ट्राइक'चा फर्स्ट लूक रिलीज

googlenewsNext
ठळक मुद्दे'उरी' चित्रपट ११ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला

जम्मू काश्मीरच्या 'उरी' येथे झालेल्या भारत-पाकिस्तानच्या हल्ल्यात १९ भारतीय सैनिकांना वीरमरण आले होते. भारताने यावेळी सर्जिकल स्ट्राईक करुन पाकिस्तानला चांगला धडा शिकवला होता. याच हल्ल्यावर आधारित हा 'उरी' चित्रपट आहे. या चित्रपटाचा पोस्टर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या पोस्टरवर अभिनेता विकी कौशल इंटेस लूकमध्ये दिसत आहे. सैनिकाच्या गेटअप व शस्त्रासोबत विकीचा लूक जबरदस्त वाटतो आहे.

'उरी'च्या पोस्टर रिलीजसोबत या सिनेमाच्या प्रदर्शनाच्या तारखेचीदेखील घोषणा केली आहे. हा चित्रपट ११ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विकीने सोशल मीडियावर 'उरी'चा पोस्टर शेअर केला असून त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

'उरी द सर्जिकल स्ट्राइक' चित्रपटाचा विषय भारतीयांसाठी भावनिक मुद्दा आहे. कारण उरी अॅटॅकनंतर प्रत्येक जणांना वाटत होते की पाकिस्तानलाही तसेच प्रत्युत्तर दिले पाहिजे आणि त्यानंतर भारतीय सैनिकांनी सर्जिकल स्ट्राइक केले होते. त्यावेळी संपूर्ण भारताने जवानांचे कौतूक केले होते. त्यामुळे हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे.
विकी कौशलने 'मसान', 'राझी', 'संजू' आणि अलिकेडेच रिलीज झालेल्या 'मनमर्जियां', या चित्रपटात वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. त्याच्या दमदार अभिनयाचे सर्वांनी कौतुक केले. आता 'उरी' या चित्रपटात तो वीरजवानाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचा टीझरही लवकरच प्रदर्शित होणार आहे. 

Web Title: Viki Kaushal's upcoming film 'Uri - The Surgical Strike', First Look Released

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.