विक्रम भट यांनी केली बॉलिवूडची पोलखोल, म्हणाले- मोठ्या पार्टीमध्ये ड्रग्स...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2020 10:36 AM2020-09-19T10:36:27+5:302020-09-19T10:36:34+5:30
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूमधील ड्रग्सच्या कनेक्शन समोर आल्यानंतर सगळीकडे यावर जोरदार वादविवाद सुरु झाले आहेत.
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूमधील ड्रग्सच्या कनेक्शन समोर आल्यानंतर सगळीकडे यावर जोरदार वादविवाद सुरु झाले आहेत. कंगना राणौतने हा मुद्दा उठवला. त्यानंतर बॉलिवूडमध्ये ड्रग्जसंदर्भात विविध प्रकारची खुलासे होत आहेत. याच दरम्यान, बॉलिवूडमधील ड्रग्सबाबत चित्रपट निर्माते आणि निर्माता विक्रम भट्टणे यांनीही आपलं मत व्यक्त केले आहे. न्यूज 18 च्या रिपोर्टनुसार विक्रम भट म्हणाले, त्यांनी बॉलिवूडमधील अनेक मोठ्या पार्टीत ड्रग्सबाबत खूप काही ऐकलं आहे पण स्वत:हून कधी काही पाहिलं नाही.
पाहुण्यांना पसंतीचे ड्रग्स दिले जातात
रिपोर्टनुसार, विक्रम भट म्हणाले, मी अनेक मोठ्या पार्ट्यांमध्ये गेलो आहे. परंतु अशा पार्टीत कधीही गेला नाही जिथे ड्रग्स होते. मला कुणी तरी सांगितले होते की, पार्टीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग्स ऑफर केले जातात. ड्रग्स ट्रेमधून दिले जातात. पार्टीत आलेल्या पाहुणे आपल्या पसंतीटे ड्रग्स घेतात. मात्र मी हे सगळे स्वत: कधी बघितले नाही.
विक्रम भट यांच्या म्हणण्यानुसार, बॉलिवूडमध्ये ड्रग्स ही मोठी गोष्ट नाही. सध्या लोक त्या सेलिब्रेटींना पकडण्याचा प्रयत्न करतायेत जे चर्चेत आहेत. पुढे ते म्हणाले, मी हे नाही म्हणत की बॉलिवूडमध्ये ड्रग्सचे सेवन केले जात नाही. ड्रग्स बॉलिवूडसाठी खास आहेत.
विक्रम भट यांना कंगनाबद्दल छेडले
काही दिवसांपूर्वी नवभारत टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत विक्रम भट यांना कंगनाबद्दल छेडले गेले. वादांच्या पार्श्वभूमीवर कंगनासोबत काम करण्याची संधी मिळाल्यास करणार का? असा प्रश्न त्यांना या मुलाखतीत विचारण्यात आला. यावर विक्रम यांनी अनोखे उत्तर दिले. ‘मी तिच्यासोबत काय काम करणार? आजकाल ती स्वत:च सिनेमे दिग्दर्शित करतेय. मी तिच्यासोबत काम करणारच नाही, असे मी म्हणणार नाही. पण मी तिच्यासोबत करणार काय? तिच्यासोबत सिनेमा केला तर मला चित्रपटात क्लॅप मारावी लागेल. म्हणजे मी क्लॅप बॉयच्या भूमिकेत असेन. कारण कंगना स्वत:चा कथा लिहिते, स्वत:च दिग्दर्शित करते, अशात मला कामच उरणार नाही,’ असे विक्रम भट म्हणाले.