विक्रम भट्ट शिकवणार धडा!! केआरकेला मानहानीप्रकरणी नोटीस!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2016 11:16 AM2016-06-23T11:16:13+5:302016-06-23T16:46:13+5:30
कमाल आर खान अर्थात केआरके म्हणजे वादग्रस्त व्यक्तिमत्त्व. twitterवर बॉलिवूड सेलिब्रिटींना लक्ष्य करणे, त्यांच्यावर वादग्रस्त कमेंट करणे हा केआरकेचा आवडता ...
क ाल आर खान अर्थात केआरके म्हणजे वादग्रस्त व्यक्तिमत्त्व. twitterवर बॉलिवूड सेलिब्रिटींना लक्ष्य करणे, त्यांच्यावर वादग्रस्त कमेंट करणे हा केआरकेचा आवडता उद्योग. साहजिक केआरके अनेक सेलिब्रिटींच्या रडारवर आहे. केआरकेने आत्तापर्यंत बºयाच बॉलिवूड सेलिब्रिटींचा अपमान केला.अलीकडे सोनाक्षी सिन्हा, आलिया भट्ट अशा अनेक अभिनेत्रींबद्दल केआरकेने आक्षेपार्ह टीप्पणी केली. सोनाक्षीने यानंतर twitterवरच केआरकेला चांगलेच फैलावर घेतले होते. तर आलियाच्या बचावार्थ सिद्धार्थ मल्होत्रा पुढे आला होता. अशाच एका प्रकरणात सनी लिओनीने केआरकेविरूद्ध सायबर सेलमध्ये तक्रार केली होती. मात्र आजपर्यंंत कुठल्याही सेलिब्रिटीनी केआरकेवर मानहानी दावा ठोकला नव्हता. मात्र आता दिग्दर्शक व निर्माते विक्रम भट्ट यांनी केआरकेला धडा शिकवायचे ठरवलेले दिसतेय. विक्रम भट्ट यांनी केआरकेला मानहानीप्रकरणी कायदेशीर नोटीस बजावली आहे. अर्थात केआरकेला यानेही काहीच फरक पडलेला दिसत नाहीय. या नोटीसचा फोटो सोशल मीडियावर टाकत हे माझ्यासाठी बक्षिस असल्याचे त्याने म्हटले आहे.
विक्रम भट्ट यांनी केआरकेला कायदेशीर नोटीस का पाठवली, याबाबतचे संकेत स्वत: केआरकेने दिले आहेत. मी विक्रम भट्ट यांना सांगू इच्छितो की, मीरा चोपडा हिने स्वत: मला सर्व स्टोरी सांगितली होती. मी माझ्यावतीने त्या रिव्ह्यूमध्ये लिहिलेले नाही, असे tweet केआरकेने केले आहे. आता जरा मागे जावू. केआरकेने मीरा चोपडाचा चित्रपट ‘1920 लंडन’चा रिव्ह्यू लिहिला होता. यात केआरकेने कास्टिंग काऊचचे (??)संकेत दिले होते.