रणवीर सिंहच्या ‘या’ गाण्याने रचला विक्रम!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2017 09:41 AM2017-09-24T09:41:35+5:302017-09-24T15:11:35+5:30
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह याच्यावर चित्रीत एका गाण्याने रेकॉर्ड नोंदवला गेलाय. होय, ‘नशे सी चढ गई है’ या गाण्याला युट्यूबवर ३० कोटींवर views मिळाले आहेत.
ब लिवूड अभिनेता रणवीर सिंह याच्यावर चित्रीत एका गाण्याने रेकॉर्ड नोंदवला गेलाय. होय, ‘नशे सी चढ गई है’ या गाण्याला युट्यूबवर ३० कोटींवर views मिळाले आहेत. २०१६ साली आलेला रणवीरचा ‘बेफिक्रे’ बॉक्सआॅफिसवर फ्लॉप ठरला असला तरी या चित्रपटातील ‘नशे सी चढ गई है’ हे गाणे मात्र सुपरडुपर हिट ठरले आहे.
‘नशे सी चढ गई है’ या गाण्यात रणवीर सिंह आणि वाणी कपूर अतिशय हॉट अंदाजात दिसले होते. अरिजीत सिंहच्या आवाजातील हे गाणे अतिशय लोकप्रीय झाले होते. एका वर्षापूर्वी वायआरएफच्या युट्यूब चॅनलवर हे गाणे लॉन्च केले गेले होते. तेव्हापासून आजपर्यंत या गाण्याला विक्रमी ३० कोटींवर views मिळाले आहेत. एका गाण्याला लोकांचा इतका प्रतिसाद आणि प्रेम मिळालेले पाहून, या चित्रपटाशी संबंधित अनेकांनी आपला आनंद व्यक्त केला आहे. रणवीरने आपला आनंद व्यक्त करत सर्वांचे आभार मानले आहेत. हे अनपेक्षित आहे, असे त्याने म्हटले आहे.
ALSO READ: दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगने गुपचूप उरकला साखरपुडा ?
एकंदर काय तर, रणवीरचा ‘बेफिक्रे’ किमान या गाण्यामुळे तरी प्रेक्षकांच्या लक्षात राहणार आहे. रणवीर व वाणीच्या ‘किसिंग सीन्स’मुळे हा चित्रपट चर्चेत आला होता. जगप्रसिद्ध आयफेल टॉवरवर या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला होता. यातील ‘नशे सी चढ गई है’ या गाण्याप्रमाणेच ‘उडे दिल बेफिक्रे’ हे गाणेही लोकप्रीय झाले होते. अर्थात तरिही हा चित्रपट बॉक्सआॅफिसवर दणकून आपटला होता. समीक्षकांनी ‘बालिश’ अशा शब्दांत या चित्रपटाचे वर्णन केले होते. यातील वाणीच्या अभिनयाचीही खिल्ली उडवली गेली होती. केवळ तिचा अभिनय नाही तर तिच्या लूकवरूनही तिची खिल्ली उडवली गेली होती. या चित्रपटाआधी वाणीने लीप आणि जॉ लाईन सर्जरी केल्याची चर्चा होती. यानंतरच्या तिच्या बदललेल्या लूकवर अनेक जोक्सही झाले होते. ‘ खूबसूरत वाणी बदल गईं हैंडसम वाना ’, अशा शब्दांत तिची टर उडवली गेली होती.