Vikram Vedha : हृतिक रोशनचं ऐकलं अन् पुढचं सगळं बिघडलं, ‘विक्रम वेधा’च्या निर्मात्यांना फुटला घाम!!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 05:04 PM2022-06-29T17:04:13+5:302022-06-29T17:07:40+5:30
Vikram Vedha : होय,हृतिक रोशनचं ऐकणं ‘विक्रम वेधा’च्या निर्मात्यांना चांगलंच महागात पडलं. चित्रपटाचा बजेट अव्वाच्या सव्वा वाढला आणि यामुळे पुढचं सगळं गणित बिघडलं.
बॉलिवूडचा ‘ग्रीक गॉड’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan ) सध्या ‘विक्रम वेधा’ (Vikram Vedha ) या सिनेमात बिझी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा आहे. अगदी या चित्रपटातील हृतिकचा लुक, या चित्रपटासाठी त्याने घेतलेली मेहनत अशा सगळ्या गोष्टींची चर्चा होताना दिसतेय. तूर्तास चर्चा आहे ती या चित्रपटाच्या बजेटची. होय, चित्रपटाच्या बजेटबद्दलची एक बातमी कानावर येतेय आणि ती ऐकून सगळेच हैराण झाले आहेत. हृतिक रोशनचं ऐकणं ‘विक्रम वेधा’च्या निर्मात्यांना चांगलंच महागात पडलं. चित्रपटाचा बजेट अव्वाच्या सव्वा वाढला आणि यामुळे पुढचं सगळं गणित बिघडलं.
चर्चा खरी मानाल तर निर्मात्यांना ‘विक्रम वेधा’चं शूटिंग उत्तर प्रदेशमध्ये करायचं होतं. पण हृतिकनं ते मुंबईत करावं, असा सल्ला दिला. निर्मात्यांनी तो मानला आणि मुंबईत उत्तर प्रदेशचा सेट तयार करावा लागला. मग काय? बजेट अव्वाच्या सव्वा वाढलं. इतकं की यामुळे निर्मात्यांचं सगळं प्लानिंग विस्कटलं.
‘विक्रम वेधा’ हा साऊथच्या सिनेमाचा रिमेक आहेत. ‘विक्रम वेधा’ पहिल्यांदा तामिळमध्ये बनला होता.11 कोटी रूपयांत हा सिनेमा बनून तयार झाला होता. मेकर्सनी याच्या हिंदी रिमेकसाठी बजेट वाढवून दिला होता. पण हृतिकने मेकर्सला अनेक सल्ले दिलेत. अनेक नव्या नव्या कल्पना सुचवल्या आणि त्यावर अंमल करणं निर्मात्यांना भोवलं.
तामिळ चित्रपटाचं बजेट होतं 11 कोटी रुपये. आता या चित्रपटाचं बजेट पोहोचलं आहे ते 175 कोटींवर. अर्थात यात किती सत्यता आहे, हे आम्हाला ठाऊक नाही. कारण अद्याप ‘विक्रम वेधा’च्या निर्मात्यांनी बजेटवरून काहीच विधान केलेलं नाही.
‘विक्रम वेधा’ या चित्रपटात हृतिक रोशनबरोबर सैफ अली खानही आहे. हा सिनेमा साऊथमध्ये 2017 मध्ये रिलीज झाला होता. त्यात आर माधवन आणि विजय सेतुपती लीड रोलमध्ये होते. आता याच्या हिंदी रिमेकमध्ये आता हृतिक आणि सैफची जोडी दिसणार आहे.