Hrithik Roshan: वाढदिवशी हृतिकचं चाहत्यांना मोठं गिफ्ट, बहुचर्चित 'विक्रम वेधा'तील फर्स्ट लूक आला समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2022 12:00 IST2022-01-10T11:56:17+5:302022-01-10T12:00:07+5:30
Vikram Vedha : विक्रम वेधा 2017 मध्ये आलेल्या तमिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे.

Hrithik Roshan: वाढदिवशी हृतिकचं चाहत्यांना मोठं गिफ्ट, बहुचर्चित 'विक्रम वेधा'तील फर्स्ट लूक आला समोर
मुंबई: 2017 मध्ये रिलीज झालेला तमिळ चित्रपट विक्रम-वेधाचा हिंदीत रिमेक येत आहे. या चित्रपटात हृतिक रोशन(Hrithik Roshan) आणि सैफ अली खान काम करत आहेत. सैफ विक्रम आणि हृतिक वेधाचे पात्र साकारत आहे. दरम्यान,आज आपल्या वाढदिवशी हृतिकने ‘विक्रम-वेधा’ (Vikram Vedha) चित्रपटातील त्याचा फर्स्ट लूक रिलीज केला आहे.
विक्रम-वेधामधील हृतिकचे पात्र एकदम डॅशिंग स्वरुपाचे दिसत आहे. आपल्या पात्रासाठी हृतिकने मोठी दाढी वाढवलेली दिसतीये. तसेच, डोळ्यांवर काळा चष्मा आणि काळ्या कुर्त्यात तो रक्ताने माखलेला दिसतोय. विक्रम वेधाच्या तमिळ व्हर्जनमध्ये वेदाची भूमिका विजय सेतुपतीने साकारली होती. तसेच, त्या चित्रपटातही विजय सेतुपतीचा लूक असाच होता.
वेधा
— Hrithik Roshan (@iHrithik) January 10, 2022
.
VEDHA#vikramvedhapic.twitter.com/4GDkb7BXpl
या चित्रपटात सैफ अली खान विक्रम या पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट विक्रम-वेधाचे मूळ दिग्दर्शक पुष्कर-गायत्री दिग्दर्शीत करत आहेत. आज वाढदिवसामुळे हृतिक लुक रिलीज करण्यात आला आहे. पण, सैफचा फर्स्ट लूक अद्याप शेअर करण्यात आलेला नाहीये. या चित्रपटामध्ये राधिका आपटेही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
सुपरहिट साऊथ चित्रपटाचा रिमेक!
विक्रम वेधा 2017 मध्ये आलेल्या तमिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. त्या सुपरहिट चित्रपटात आर माधवनने पोलीस अधिकारी विक्रमची भूमिका साकारली, तर विजय सेतुपतीने गँगस्टर वेधाची भूमिका साकारली होती. हा चित्रपट विक्रम-वेताळाच्या प्राचीन कथेवरुन प्रेरीत आहे.