Photo: 'बालिका वधू'फेम विक्रांत मेस्सी अडकणार लग्नाच्या बेडीत; लवकरच करणार 'या' मॉडेलसोबत लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 06:30 PM2022-02-04T18:30:00+5:302022-02-04T18:30:00+5:30

Vikrant massey: विक्रांत २०२० मध्येच लग्न करणार होते. परंतु, कोविडच्या संकटामुळे लग्नाची तारीख पुढे ढकलण्यात आली.

vikrant massey and his fiancee sheetal thakur to tie the knot later this year | Photo: 'बालिका वधू'फेम विक्रांत मेस्सी अडकणार लग्नाच्या बेडीत; लवकरच करणार 'या' मॉडेलसोबत लग्न

Photo: 'बालिका वधू'फेम विक्रांत मेस्सी अडकणार लग्नाच्या बेडीत; लवकरच करणार 'या' मॉडेलसोबत लग्न

googlenewsNext

'बालिका वधू' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे विक्रांत मेस्सी (Vikrant Massey). असंख्य मालिका आणि चित्रपटांमध्ये झळकलेल्या विक्रांतची सोशल मीडियावर कायमच चर्चा होत असते. विशेष म्हणजे कतरिना कैफ आणि विकी कौशलच्या (Katrina Kaif and Vicky Kaushal) लग्नानंतर आता विक्रांतदेखील बोहल्यावर चढायला सज्ज झाला आहे. विक्रांत लवकरच लग्न करणार आहे.

सध्या कलाविश्वात लग्नसराईचे वारे वाहत आहेत. विकी कतरिनानंतर मौनी रॉयनेही तिच्या प्रियकरासोबत लग्नगाठ बांधली. त्यातच आता अभिनेत्री करिश्मा तन्नाच्या घरीही लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे. त्यामुळे सध्या कलाविश्वात अनेक लोकप्रिय कलाकार एकापाठून एक लग्न करतांना दिसत आहेत. यामध्येच आता विक्रांत मेस्सीदेखील शितल ठाकूरसोबत लग्न करणार आहे. विशेष म्हणजे विक्रांत आणि शितल २०२० मध्ये लग्न करणार होते. परंतु, कोविडच्या संकटामुळे लग्नाची तारीख पुढे ढकलण्यात आली.

दरम्यान,विक्रांत आणि शीतल २०१५ पासून एकमेकांना डेट करत आहेत.  २०१९ मध्ये त्यांचा साखरपुडा झाला होता. त्यानंतर आता २०२२ मध्ये ही जोडी लग्नगाठ बांधणार आहेत. सध्या विक्रांत त्याच्या गॅसलाइट या चित्रपटात व्यस्त आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर ते लग्न करणार आहेत. विक्रांत अनेक मालिकांसह लुटेरा, छपाक, हसीन दिलरुबा यासारख्या बॉलिवूडपटात झळकला आहे. 
 

Web Title: vikrant massey and his fiancee sheetal thakur to tie the knot later this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.