विक्रांत मेस्सीच्या निवृत्तीबद्दल समजताच Co-Star मेधा शंकरलाही बसला धक्का, कमेंट करत म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2024 12:12 PM2024-12-02T12:12:56+5:302024-12-02T12:13:28+5:30
विक्रांत मेस्सीला गेल्या वर्षी 12th फेल सिनेमामुळे भरघोस यश मिळालं. त्याच्या निवृत्तीवर सिनेमातील त्याची हिरोईन मेधा शंकरची रिअॅक्शन
अभिनेता विक्रांत मेस्सीने (Vikrant Massey) आज त्याच्या सोशल मीडिया पोस्टमधून सगळ्यांनाच धक्का दिला. अभिनयातून निवृत्ती घेत असल्याची त्याने घोषणा केली. पुढील वर्षी त्याचे २ सिनेमे रिलीज होतील जे शेवटचे असतील असं तो म्हणाला. मुलगा, पती आणि आता बाबा म्हणून कुटुंबाला वेळ द्यायचा असल्याने त्याने हा मोठा निर्णय घेतला. तुझ्यासारखे गुणी कलाकार कमी आहेत असं करु नको अशा कमेंट्स अनेकांनी केल्या आहेत. दरम्यान विक्रांतची 12th फेल मधली सहकलाकार मेधा शंकरनेही कमेंट केली आहे.
विक्रांत मेस्सीला गेल्या वर्षी 12th फेल सिनेमामुळे भरघोस यश मिळालं. सर्वत स्तरांतून त्याच्या अभिनयाचं कौतुक झालं. विक्रांत एक अभिनेता म्हणून जगभरात पोहोचला. पण अचानक आता निवृत्तीची घोषणा करत त्याने सर्वांनाच धक्का दिला. १२th फेल मधील अभिनेत्री मेधा शंकरने कमेंट करत 'WHAT???' असे लिहिले. तिलाही विक्रांत असा काही निर्णय घेईल ही कल्पनाही नव्हती. काय?? असं विचारत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या.
दुसरीकडे विक्रांतचा नुकताच 'साबरमती: द रिपोर्ट' रिलीज झाला. यामध्ये त्याच्यासोबत राशी खन्ना झळकली. तिनेही कमेंट करत 'What? NO!' असे लिहिले. तर अभिनेत्री दिया मिर्झानेही कमेट करत म्हटले, 'ब्रेक घेणं हे बेस्ट असतं. तू ही दुसरी बाजूही खूप छान सांभाळशील'.
विक्रांतची ही पोस्ट खरी आहे की पब्लिसिटी स्टंट आहे अशीही शंका अनेकजण विचारत आहेत. दरम्यान पुढील वर्षी २०२५ साली त्याचे दोन सिनेमे रिलीज होतील जे शेवटचे असतील. यानंतर तो अनिश्चित काळासाठी पडद्यावरुन दूर जाणार आहे.