'आईनेच मला लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा सल्ला दिला', विक्रांत मेस्सीने सांगितला किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2024 12:55 IST2024-08-07T12:54:28+5:302024-08-07T12:55:22+5:30
विक्रांतची पत्नी शीतल ठाकूरही अभिनेत्री आहे.

'आईनेच मला लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा सल्ला दिला', विक्रांत मेस्सीने सांगितला किस्सा
'12th फेल' फेम अभिनेता विक्रांत मेस्सी (Vikrant Massey) काही महिन्यांपूर्वीच बाबा झाला. त्याची पत्नी शीतल ठाकूरने मुलाला जन्म दिला. वरदान असं लेकाचं नाव ठेवण्यात आलं. शीतल ठाकूरही अभिनेत्री होती. एका शोच्या सेटवरच त्यांची ओळख झाली आणि ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. विक्रांतच्या आईने त्याला शीतलसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा सल्ला दिला होता असा खुलासा त्याने स्वत:च केला आहे.
विक्रांत मेस्सी untriggered या पॉडकास्टमध्ये म्हणाला, "मी आणि शीतल आता एका दशकापासून सोबत आहोत. लग्नाआधी आम्ही 8 वर्ष एकमेकांना डेट केलं. लग्नाआधी काही वर्ष रिलेशनशिपमध्ये राहून मग लग्न करणं हा खरोखरंच माझा चांगला निर्णय होता. मला तेच सूट झालं. आमचे टेम्परामेंट्स आणि आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सारखाच होता. आम्ही संपूर्ण रिलेशनशिपमध्ये म्हणजेच आठ वर्ष एकत्र राहिलो."
तो पुढे म्हणाला, "माझ्या आईनेच आम्हाला लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याबाबत सुचवलं होतं. जेणेकरुन आम्ही एकमेकांसोबत राहू शकू की नाही हे आम्हाला कळेल. माझे पालक एवढे पुढारलेल्या विचारांचे आहेत यासाठी मी स्वत:ला नशीबवान समजतो."
विक्रांत मेस्सी आगामी 'फिर आयी हसीन दिलरुबा','ब्लॅक आऊट','साबरमती रिपोर्ट' या सिनेमांमध्ये दिसणार आहे.