Video: 'छावा' सिनेमात 'कवी कलश' साकारणाऱ्या अभिनेत्याचा नवा अवतार, आगामी सिनेमातील लूक समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 10:13 IST2025-03-21T10:11:46+5:302025-03-21T10:13:01+5:30
'छावा' सिनेमात कवी कलशच्या भूमिकेत झळकलेला अभिनेता विनीत कुमार सिंगच्या आगामी सिनेमाविषयी उत्सुकता आहे

Video: 'छावा' सिनेमात 'कवी कलश' साकारणाऱ्या अभिनेत्याचा नवा अवतार, आगामी सिनेमातील लूक समोर
'छावा' सिनेमाची (chhaava movie) सध्या चांगलीच चर्चा आहे. या सिनेमातील छोट्या छोट्या व्यक्तिरेखाही लोकांच्या लक्षात राहिल्या. या सिनेमात प्रमुख भूमिकेत आपल्याला विकी कौशल (vicky kaushal), रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्ना हे कलाकार झळकले. 'छावा' सिनेमातील आणखी एक व्यक्तिरेखा चांगलीच गाजली ती म्हणजे कवी कलश. अभिनेता विनीत कुमार सिंगने (vineet kumar singh) ही भूमिका साकारली. अशातच 'छावा'नंतर विनीतच्या नव्या सिनेमातील खास लूक समोर आलाय. जाणून घ्या.
विनीतचा नवीन सिनेमा
विनीत कुमार सिंग आगामी 'जाट' सिनेमात झळकणार आहे. या सिनेमातील विनीतचा फर्स्ट लूक समोर आला आहे. डोळ्यांवर गॉगल, रंगीबेरंगी शर्ट अशा अवतारात विनीत एकदम हटके दिसत आहे. सोमुलु असं विनीतच्या कॅरेक्टरचं नाव आहे. 'जाट' सिनेमात विनीत सनी देओलसोबत झळकणार आहे. 'छावा'नंतर विनीत कुमार सिंग 'जाट' सिनेमात काय कमाल करतो, याची सर्वांना उत्सुकता आहे. विनीतचा हा नवीन लूक समोर येताच चाहत्यांनी पसंती दिली आहे.
'जाट' सिनेमा कधी रिलीज होणार?
सनी देओलची प्रमुख असलेला 'जाट' सिनेमा १० एप्रिल २०२५ ला रिलीज होणार आहे. या सिनेमात सनी देओलसोबत मुख्य खलनायक म्हणून रणदीप हूडा दिसणार आहे. 'पुष्पा २' जेव्हा रिलीज झालेला तेव्हा त्यासोबत 'जाट'चा टीझर १२,५०० स्क्रीनवर दाखवण्यात आला. हा ॲक्शन पॅक्ड टीझर पाहिल्यानंतर सर्वांना जाट सिनेमा थिएटरमध्ये पाहण्याची उत्सुकता आहे. छावानंतर विनीतला 'जाट' सिनेमात बघायला सर्वांची उत्सुकता शिगेला आहे.