"२३ वर्ष झाली माझं मुंबईत घर नाही.."; 'कवी कलश' साकारणाऱ्या अभिनेत्याची कहाणी ऐकून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 17:25 IST2025-02-24T17:24:42+5:302025-02-24T17:25:23+5:30

'छावा' सिनेमात कवी कलश साकारणाऱ्या अभिनेत्याने त्याला आलेला भावुक अनुभव शेअर केलाय (vineet kumar singh, chhaava)

vineet kumar singh talk about he didnt buy any home in mumbai chhaava kavi kalash | "२३ वर्ष झाली माझं मुंबईत घर नाही.."; 'कवी कलश' साकारणाऱ्या अभिनेत्याची कहाणी ऐकून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

"२३ वर्ष झाली माझं मुंबईत घर नाही.."; 'कवी कलश' साकारणाऱ्या अभिनेत्याची कहाणी ऐकून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

'छावा' सिनेमा (chhaava movie) रिलीज झाला अन् चांगलाच गाजला. हा सिनेमा पाहण्यासाठी लोकांनी थिएटरमध्ये हाउसफुल्ल गर्दी केली. 'छावा' सिनेमातील प्रत्येक लहान-मोठी व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या लक्षात राहिली. 'छावा' सिनेमातील सध्या चर्चेत असलेली अशीच एक व्यक्तिरेखा म्हणजे कवी कलश. अभिनेता विनीत कुमार सिंगने (vineet kumar singh) कवी कलशची भूमिका अक्षरशः जीवंत केली. विनीत इतकी वर्ष इंडस्ट्रीत काम करतोय परंतु अजून मुंबईत त्याचं स्वतःचं घर नाही, असा भावुक खुलासा त्याने केलाय.

विनीतचं अजून मुंबईत स्वतःचं घर नाही

विनीत कुमार सिंग म्हणाला की, "२३ वर्ष झाली मला मुंबईत येऊन. आजही माझं स्वतःचं घर नाहीये. ही खूप विचित्र गोष्ट आहे. मी इतकं काम करतोय, सर्वकाही आहे पण माझं स्वतःचं असं घर मी खरेदी करु शकलो नाही. मी धोका नावाचा सिनेमा करत होतो. महेश भट सर त्यावेळी आलिया भटला घेऊन यायचे. आलियाचे तेव्हा जे काही वय होतं. मी तेव्हाही स्ट्रगल करत होतो आणि आजही मी स्ट्रगलच करतोय."

"लोक बोलतात की सोनं तापल्यावर निखरतं. परंतु सोनं कायम तापलेलंच असेल तर त्याचं काम काय राहणार. त्या सोन्याला कोण परिधान करेल. आयुष्याची अनेक वर्ष अशीच तापण्यात निघून गेली आहेत. सर्व सांगतात की, संघर्ष गरजेचा आहे. मी कुठे संघर्षापासून पळतोय? परंतु किती वेळ स्ट्रगल करायचा" अशाप्रकारे विनीत कुमार सिंगने त्याच्या स्ट्रगलचा काळ सर्वांना सांगितलाय. विनीत कुमार सिंगला आपण लालबाग परळ या मराठी सिनेमात पाहिलंय. याशिवाय 'मुक्काबाज', 'गँग्ज ऑफ वासेपूर', 'मॅच फिक्सिंग' अशा हिंदी सिनेमांमध्ये विनीतने अभिनय केलाय. विनीतने सध्या 'छावा' सिनेमात साकारलेली कवी कलश ही भूमिका प्रेक्षकांंचं मन जिंकतेय.

 

Web Title: vineet kumar singh talk about he didnt buy any home in mumbai chhaava kavi kalash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.