​विनोद खन्ना बर्थडे स्पेशल !

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2016 02:31 PM2016-10-05T14:31:16+5:302016-10-05T20:01:16+5:30

विनोद खन्ना यांचा जन्म एक बिजनेस परिवारात ६ आॅक्टोंबर १९४६ साली पेशावरमध्ये झाला होता. त्यांचा परिवार १९४७ मध्ये फाळणी नंतर ...

Vinod Khanna Birthday Special! | ​विनोद खन्ना बर्थडे स्पेशल !

​विनोद खन्ना बर्थडे स्पेशल !

googlenewsNext
नोद खन्ना यांचा जन्म एक बिजनेस परिवारात ६ आॅक्टोंबर १९४६ साली पेशावरमध्ये झाला होता. त्यांचा परिवार १९४७ मध्ये फाळणी नंतर पेशावरहून मुंबईला आला होता. त्यांच्या आई-वडीलांचे नाव कमला आणि किशनचंद खन्ना होते. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपण त्यांच्याबाबतीत माहित नसलेल्या काही गोष्टी जाणून घेणार आहोत. 

अभिनयाची सुरूवात 
विनोद खन्नाच्या अभिनयाची सुरू वात १९६८ मध्ये ‘मन का मीत’ या चित्रपटातून झाली. यात त्याने खलनायकाची भूमिका केली होती. त्यानंतर १९७१ मध्ये त्याचा पहिला सोलो चित्रपट ‘हम तुम और वो’ आला. काही वर्ष त्याने चित्रपटांपासून सन्यास घेतला, त्यादरम्यान तो आचार्य रजनीशचा अनुयायी बनला होता, त्यानंतरही त्याने चित्रपट क्षेत्रात पुनरागमन केले आणि  आतापर्यंत चित्रपटात सक्रिय आहे. 

राजकीय वाटचाल 
१९९७ आणि १९९९ मध्ये विनोद खन्ना दोनदा पंजाबच्या गुरदारपुर क्षेत्रात भाजपाकडून निवडून आला होता. २००२ मध्ये संस्कृती आणि पर्यटन केंद्रीय मंत्री म्हणून कार्यभार सांभाळला होता. 

पुरस्कार 
चित्रपट क्षेत्रातील ३० वर्षापेक्षाही जास्त कालावधीच्या कामगिरीमुळे विनोदला १९९९ मध्ये फिल्मफे यरचा लाइफटाइम अ‍ॅचिव्हमेंट अ‍ॅवार्डने सन्मानित करण्यात आले.  

हॅँडसम खलनायक म्हणून प्रसिद्धी 
विनोद खन्ना फिल्म इंडस्ट्रीमध्ये निवडक अभिनेत्यांमधून एक आहेत, ज्यांनी खलनायकापासून ते नायकापर्यंत प्रत्येक प्रकारच्या भूमिका निभविल्या आहेत. 
जानकारांच्या मते ‘मेरा गाव मेरा देश’ मध्ये विनोद खन्ना एवढे हँडसम दिसत होते की, बºयाच मुली त्यांच्या ह्या रुपावर फिदा झाल्या होत्या. 
पहिल्या चित्रपटापासून विनोद यांना चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि एकाच महिन्यात एकापाठोपाठ १५ चित्रपट साइन केले. 
त्यानंतर सच्चा और झूठा, पूरब पश्चिम, आन मिलो सजना आणि मस्ताना सारख्या चित्रपटांद्वारे विनोद खन्ना सुपर सेक्सी खलनायक म्हणून प्रसिद्धीस आले.
मन का मीत सुपरहिट झाल्यानंतर विनोद खन्नाने १९७१ मध्ये गीतांजलीशी पे्रमविवाह केला होता. त्यानंतर गीतांजलीला विनोदचे राहुल व अक्षय असे दोन मुले झाली. 

१९७५ मध्ये विनोद खन्ना ओशोच्या संपर्कात आले व लवकरच ओशोचे शिष्य झाले. हळुहळु विनोद एवढे प्रभावित झाले की, १९८० मध्ये त्यांनी फिल्म इंडस्ट्रीपासून सन्यास घेतला. आणि अमेरिकेच्या ओशो आश्रमात चालले गेले. विनोदने जेव्हा सन्यासी बनण्याची इंडस्ट्रीमध्ये सन्यास घेण्याची घोषणा केली तर त्यांना सेक्सी सन्यासीची उपमा दिली गेली. त्यांच्या मुलांना शाळेत चिडवू लागले की, तुमचे वडील ओशोसोबत पडून गेले. एकदा स्वत: मुलाखतीत विनोदने जाहीर केले की, ओशोच्या आश्रमात माळीचे काम आणि टॉयलेटची सफाई करतो असे. ओशोच्या सन्यासानंतर गीतांजली एकटी पडली आणि विनोदशी तिने घटस्पोट घेतला. 

पाच वर्ष रजनीशपुरममध्ये राहिल्यानंतर विनोद अमेरिकाहून मुंबई परतले. कारण ते आश्रमच्या जीवनाला कंटाळले होते. 
ते आपल्या मुलांजवळ वापस आले आणि पून्हा इंडस्ट्रीमध्ये काम सुरु केले. त्यानंतर १९९० मध्ये विनोदने कविताशी लग्न केले. मुलगा साक्षी आणि मुलगी श्रद्धा असे दोन मुलांना कविताने जन्म दिला.

राजकारणाबरोबरच सध्या विनोद खन्ना चित्रपटातही सक्रिय आहे. सलमान खान अभिनित दबंग आणि दबंग २ मध्ये विनोदचा अभिनय पाहावयास मिळतो. 
विनोद खन्ना बºयाचवेळा मंत्रीदेखील झाले आहेत आणि २०१४ पासून पून्हा गुरदासपुर येथून निवडून आले आहेत. 

Web Title: Vinod Khanna Birthday Special!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.