विनोद खन्नाचा मुलगा साक्षी खन्नाचे बॉलिवूड पदार्पण का लांबले?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2017 09:39 AM2017-06-22T09:39:41+5:302017-06-22T15:09:41+5:30
अभिनेते विनोद खन्ना आज आपल्यात नाहीत. विनोद खन्ना यांचा मुलगा साक्षी खन्ना बॉलिवूड डेब्यू करणार, अशी बातमी मध्यंतरी आपल्या ...
अ िनेते विनोद खन्ना आज आपल्यात नाहीत. विनोद खन्ना यांचा मुलगा साक्षी खन्ना बॉलिवूड डेब्यू करणार, अशी बातमी मध्यंतरी आपल्या कानावर आलीच असेल. साक्षीच्याच बॉलिवूड डेब्यूविषयी एक नवी बातमी आहे. होय, बॉलिवूडचे दिग्गज दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटातून साक्षी बॉलिवूड डेब्यू करणार, अशी खबर होती. पण आता साक्षीचे बॉलिवूड पदार्पण लांबले आहे. कदाचित आपल्या बॉलिवूड डेब्यूसाठी साक्षीला आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार. याचे कारण म्हणजे, साक्षी ज्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार होती, तो चित्रपटच लांबला आहे.
संजय लीला भन्साळींचे ‘एसएलबी फिल्म्स’ हे प्रॉडक्शन हाऊस हा चित्रपट प्रोड्यूस करणार आहेत. तर मुकेश छाबरा हे हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहेत. पण अद्याप नाव न ठरलेल्या या रोमॅन्टिक ड्रामा मुव्हीच्या मार्गात एक अडचण आलीय. होय, हा चित्रपट हाती घेतलाच तर दिग्दर्शक म्हणून हा छाबरा यांचा पहिला चित्रपट असेल. तसाच साक्षीचाही अभिनेता म्हणून पहिला चित्रपट असेल. मुळात हीच अडचण आहे. एकाच चित्रपटात दोन नव्या लोकांना संधी देणे योग्य ठरेल का, याबाबत भन्साळींच्या मनात संभ्रम आहे. सध्या ते यावर विचार करत आहेत. हा चित्रपट एक बिग बजेट सिनेमा असणार आहे. त्यामुळे दोन न्यू कमर्सला यातून संधी देणे किती फायद्याचे आणि किती तोट्याचे ठरेल, यावर भन्साळींचे मंथन सुरु आहे. एकंदर काय तर भन्साळींना तोट्याचा सौदा करायचा नाही. त्यामुळे योग्य विचाराअंतीच ते निर्णय घेणार आहेत आणि या निर्णयावर साक्षीचा बॉलिवूड डेब्यू अवलंबून असणार आहे. तोपर्यंत साक्षीला अर्थातच प्रतीक्षा करावी लागणार आहे. तूर्तास भन्साळी ‘पद्मावती’मध्ये बिझी आहे.
१९९० मध्ये विनोद खन्ना यांनी कविता दफ्तरीशी दुसरे लग्न केले होते. या दुसºया पत्नीपासून विनोद खन्ना यांना साक्षी आणि श्रद्धा अशी दोन मुले झालीत.