Viral : Sacred Games नंतर राधिका आपटे अधिक झाली बोल्ड, समोर आले फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2018 06:00 IST2018-10-03T12:55:13+5:302018-10-04T06:00:00+5:30
राधिका आपटे सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह असते. ती नेहमी सोशल मीडियावर चाहत्यांशी संवाद साधत असते. तसेच आपले वेगवगेळ्या अंदाजातील फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत रसिकांची वाहवा मिळवत असते.

Viral : Sacred Games नंतर राधिका आपटे अधिक झाली बोल्ड, समोर आले फोटो
मराठमोळी राधिका आपटे बोल्ड आणि बिनधास्त म्हणून चित्रपटसृष्टीत प्रसिद्ध आहे. आपल्या मनात जे आहे ते बिनधास्त आणि बेधडकपणे मांडणे, कुणाचीही विशेषतः लोक काय विचार करतील याचा विचार न करता व्यक्त होणारी एक रोखठोक अभिनेत्री अशी राधिका आपटे हिची ओळख. वैयक्तीक असो वा व्यावसायिक कोणत्याही गोष्टीवर आपलं ठाम मत मांडताना ती जराही कचरत नाही. राधिका आपटे सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह असते. ती नेहमी सोशल मीडियावर चाहत्यांशी संवाद साधत असते. तसेच आपले वेगवगेळ्या अंदाजातील फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत रसिकांची वाहवा मिळवत असते.
आता पुन्हा तिचा एक फोटो समोर आला आहे. ब्लॅक शर्टमध्ये कॅमे-यात कॅप्चर झालेला तिच्या सेक्सी फोटोला रसिकांची तुफान पसंती मिळत आहे. या फोटोसोबतच तिचे काही फोटोंनाही चाहते कौतुकाचा वर्षाव करताना दिसत आहेत. राधिकाने नुकतेच फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमध्ये तिचा बोल्ड, हॉट आणि सेक्सी अंदाज पाहायला मिळत आहे. राधिक सुंदर तर दिसतेच आहे शिवाय तिच्या अदा तितक्याच बोल्ड आणि अंदाजही हॉट असल्याचे दिसून येत आहे.
तिचा बोल्ड लूक आणि बिनधास्त अंदाज कुणालाही क्लीन बोल्ड करेल असाच पाहायला मिळत आहे. तिने हे फोटोशूट जी क्यू मॅगेझिनसाठी हे फोटोशूट केले आहे. या मॅगेझिनसाठी तिची एकेक सेक्सी अदा कॅमे-यात कैद झालीय.नेहमीप्रमाणेच तिच्या या अदांनी सा-यांना वेड लावलंय. ऑन एंड ऑफ स्क्रीन बोल्ड लूकमुळे चर्चेत असणारी राधिका प्रत्यक्ष जीवनातही बिनधास्त आणि रोखठोक आहे.
नेटफ्लिक्सवरील लस्ट स्टोरीज, सेक्रेड गेम्स आणि घोल या तिन्ही सीरिजमध्ये राधिका आपटेची भूमिका आहे. या तिन्ही वेबसिरिजच्या टीममध्ये विक्रमादित्यचा समावेश आहे. त्यामुळे विक्रमादित्य आणि राधिका यांचे खऱ्या आयुष्यात आणि व्यवसायिक आयुष्यात ट्युनिंग खूपच चांगले आहे.लस्ट स्टोरीजमध्ये कालंदी, सेक्रेड गेम्समध्ये अंजली माथुर आणि घोलमध्ये निदा रहिम अशा भूमिका राधिका आपटेने साकारल्या आहेत.
सध्या ती नेटफ्लिक्सच्या सगळ्याच सिरिजमध्ये दिसत असल्याने नेटफ्लिक्स आणि राधिका हे एक समीकरणच बनले आहे आणि पण यावरूनच तिची सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी टर उडवली गेली होती.राधिका आपटे नेटफ्लिक्सची सूर्यवंशम असल्याचे नेटिझन्सनी म्हटले होते. पण राधिका आणि नेटफ्लिक्सने मिळून या ट्रोलना चांगलेच उत्तर दिले होते. सोशल मीडियावर राधिकाला करण्यात आलेल्या ट्रोलकडे राधिका आणि नेटफ्लिक्सने अतिशय सकारात्मक दृष्टीने पाहिले होते.