Viral Memes : रणवीर सिंगच्या अतरंगी कपड्यांमुळे वैतागली ‘कामवाली बाई’!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2019 13:11 IST2019-02-13T13:10:32+5:302019-02-13T13:11:32+5:30
रणवीर सिंग सध्या ‘गली बॉय’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. पण या प्रमोशनदरम्यानचा रणवीरचा अतरंगी अंदाज पुन्हा एकदा चर्चेत आलाय.

Viral Memes : रणवीर सिंगच्या अतरंगी कपड्यांमुळे वैतागली ‘कामवाली बाई’!!
रणवीर सिंग सध्या ‘गली बॉय’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. पण या प्रमोशनदरम्यानचा रणवीरचा अतरंगी अंदाज पुन्हा एकदा चर्चेत आलाय. ‘गली बॉय’च्या प्रमोशन इव्हेंटमध्ये रणवीर ज्याप्रकारचे अतरंगी कपडे घालून दिसतोय, त्यावरून त्याची जोरदार खिल्ली उडवली जातेय. त्याच्या चित्र-विचित्र स्टाईलवरचे अनेक मजेदार मीम्स व्हायरल होत आहेत.
बर्लिन फिल्म फेस्टिवलमध्ये रणवीरचा वेगळाच अंदाज दिसला. या इव्हेंटमधील त्याच्या कपड्यांनी, स्टाईलनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. मग काय, ‘गली बॉय’ऐवजी रणवीरचीच चर्चा रंगली. साहजिकच नेटक-यांच्या कल्पनाशक्तीलाही पंख फुटलेत. त्याच्यावरचे फनी मीम्स पाहून,तुम्हीही या कल्पनाशक्तीची दाद द्याल. तेव्हा बघा आणि पोटभर हसा...
‘गली बॉय’मध्ये रणवीर सिंग नावेद शेख(रॅपर नैजीचे खरे नाव नावेद शेख आहे) नामक युवकाची भूमिका साकारताना दिसणार आहे. ही भूमिका साकारण्यासाठी रणवीरने प्रचंड मेहनत घेतली. अगदी डिवाइन व नैजीसारख्या रॅपर्सकडून सुमारे १० महिने प्रशिक्षण घेतले. या चित्रपटाचे दिग्दर्शन झोया अख्तरने केले आहे.