Virat Anushka: विराट कोहली- अनुष्का शर्माकडे आहे बक्कळ पैसा, तरीदेखील लेकीसाठी भाड्यानं घेतली ही वस्तू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2022 10:41 AM2022-06-11T10:41:50+5:302022-06-11T10:42:28+5:30

Virat Kohli And Anushka Sharma: सध्या विराट कोहली आणि अनुष्का शर्मा सध्या व्हॅकेशन एन्जॉय करत आहेत.

Virat Anushka: Virat Kohli- Anushka Sharma has a lot of money, but still rents it for Leki | Virat Anushka: विराट कोहली- अनुष्का शर्माकडे आहे बक्कळ पैसा, तरीदेखील लेकीसाठी भाड्यानं घेतली ही वस्तू

Virat Anushka: विराट कोहली- अनुष्का शर्माकडे आहे बक्कळ पैसा, तरीदेखील लेकीसाठी भाड्यानं घेतली ही वस्तू

googlenewsNext

सध्या बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) तिचा पती विराट कोहली (Virat Kohli) आणि त्यांची मुलगी वामिका(Vamika)सोबत व्हॅकेशन एन्जॉय करते आहे. विराट आणि अनुष्का मीडिया आणि पापाराझीपासून दूर राहणे पसंत करते, परंतु ते अनेकदा त्यांच्या सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. अलीकडेच, विराट अनुष्काच्या व्हॅकेशनचा एक फोटो सोशल मीडियावर समोर आला. या फोटोला चाहत्यांची खूप पसंती मिळाली.

अनुष्का शर्माने या व्हॅकेशनचा आणखी एक फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे. अनुष्काने वामिकाला फिरण्यासाठी सायकल भाड्याने घेतली आहे आणि वामिकाचा चेहरा लपवत सायकलचा फोटो शेअर केला. अनुष्काने ही सायकल भाड्याने घेतली असली तरी त्यावर तिच्या मुलीचे नाव वामिका लिहिले आहे.


हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. विराट अनुष्काचे हे फोटो समोर आल्यानंतर, चाहते तिच्या आणखी व्हॅकेशन फोटोंची आतुरतेने वाट पाहत आहेत. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे चित्रपट आणि क्रिकेट जगतातील पॉवर कपल मानले जातात. दोघेही सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात आणि अनेकदा त्यांच्या चाहत्यांसाठी फोटो शेअर करत असतात.

आगामी प्रोजेक्ट
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अनुष्का शर्मा लवकरच 'चकडा एक्सप्रेस' चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट झुलन गोस्वामीचा बायोपिक आहे. झुलन ही भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार आहे. जानेवारी २०२२ मध्ये अनुष्का शर्माने या चित्रपटाचा टीझर शेअर केला होता. अनुष्काचा हा चित्रपट २ फेब्रुवारी २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Virat Anushka: Virat Kohli- Anushka Sharma has a lot of money, but still rents it for Leki

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.