'या' लोकप्रिय जोडीला ओळखलं का? त्याचा क्रिकेटमध्ये तर तिचा बॉलिवूडमध्ये आहे दबदबा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 16:49 IST2025-02-21T16:49:21+5:302025-02-21T16:49:46+5:30
विशेष म्हणजे हा व्हिडीओ पाहिल्यानंतरही या प्रसिद्ध जोडीला ओळखणं कठीण आहे.

'या' लोकप्रिय जोडीला ओळखलं का? त्याचा क्रिकेटमध्ये तर तिचा बॉलिवूडमध्ये आहे दबदबा
सध्याच्या काळात सोशल मीडिया अत्यंत प्रभावी माध्यम झालं आहे. यात बऱ्याचदा सेलिब्रिटींचे जुने व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातून जुन्या आठवणींना उजाळा चाहते देत असतात. सध्या असाच एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये एक लोकप्रिय जोडपं मुंबईच्या रस्त्यावर स्कुटीवरुन फेरफटका मारताना दिसून येत आहे. या व्हिडीओमधील हे कपलं त्याच्या क्षेत्रात भक्कमपणे पाय रोवून उभं आहे. विशेष म्हणजे हा व्हिडीओ पाहिल्यानंतर या प्रसिद्ध जोडीला ओळखणं कठीण आहे.
मुंबईच्या रस्त्यावर स्कुटीवरुन फेरफटका मारणारी ही जोडी अशी तशी नाही. एकाचा क्रिकेटमध्ये तर एकाचा बॉलिवूडमध्ये दबदबा आहे. जर तुम्हाला आता देखील ही जोडी कोण आहे असा प्रश्न पडला असेल, तर ही जोडी दुसरी तिसरी कोणीची नसून अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि क्रिकेटर विराट कोहलीची (Virat Kohli) आहे. अनुष्का आणि विराटाचा हा जुना व्हिडीओ सध्या चर्चेत आलाय. तीन वर्षांपूर्वी २०२२ मध्ये विराट आणि अनुष्का हे अगदी सामान्य लोकांसारखं स्कूटीवरून मुंबईच्या रस्त्यावर फिरत होते. दोघांनीही हेल्मेट घातलेल होतं. त्यामुळे त्यांना सहज कुणी ओळखू शकलं नाही.
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा नेहमीच कपल गोल्स देताना दिसतात. अनुष्का नेहमीच विराटला सपोर्ट करताना दिसते. तर विराटचंही तिच्यावर प्रचंड प्रेम आहे. ते दोघे कधी डान्स व्हिडिओंनी चाहत्यांचं मनोरंजन करतात. तर कधी एकत्र जिममध्ये कसरत करताना दिसतात. विराट आणि अनुष्का यांची भेट एका जाहिरातीच्या शूटिंगच्या वेळी झाली होती. नंतर दोघांची मैत्री झाली, त्यानंतर दोघांमध्ये प्रेम फुलू लागले. अखेर तब्बल ४ वर्षांनंतर ११ डिसेंबर २०१७ रोजी दोघांचं लग्न झालं. इटलीतील लेक कोमो येथे दोघांचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार उपस्थित होते.
विराट कोहली सध्या १९ फेब्रुवारीपासून पाकिस्तान आणि दुबई येथे सुरू झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी तयारी करतोय. तर अनुष्का शर्मा बॉलिवूडपासून सध्या दूर असून तिनं मुलं आकाय आणि वामिकावर लक्ष केंद्रीत केलं आहे. अनुष्का शर्मा बऱ्याच काळापासून चित्रपटांमध्ये दिसलेली नाही. महिला क्रिकेटपटू झुलन गोस्वामीवरील बायोपिक 'चकदा एक्सप्रेस'मुळे अनुष्का गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. चित्रपटाचं शुटिंग झालं आहे. पण, तो कधी प्रदर्शित होणार, याबद्दल काहीच अपडेट नाही.