लेक वामिकासह लंडनच्या रस्त्यावर फिरताना दिसले विराट-अनुष्का, Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 11:32 IST2023-12-01T11:31:22+5:302023-12-01T11:32:00+5:30
विराट-अनुष्काचे लंडनमधील काही फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

लेक वामिकासह लंडनच्या रस्त्यावर फिरताना दिसले विराट-अनुष्का, Video व्हायरल
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) वर्ल्डकपनंतर फिरण्याचा आनंद घेत आहेत. दोघंही नेहमी कामातून ब्रेक घेत देशाबाहेर जाऊन वेळ घालवतात. नुकतंच वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात भारताला हार पत्करावी लागली. क्रिकेट टीमसोबतच चाहतेही निराश झाले. तर विराट कोहलीने टी २० मधून विश्रांती घेत असल्याची विनंती बीसीसीआयला केली आहे. नुकतंच अनुष्का आणि विराट लेक वामिकासोबत लंडनमध्ये दिसले. तिथल्या एका चाहत्याने विराटसोबतचा फोटोही अपलोड केला आहे.
विराट-अनुष्काचे लंडनमधील काही फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये दोघंही लेक वामिकासोबत एन्जॉय करत आहेत. लंडनमध्येच एका भारतीय तरुणाला विराटला भेटण्याची संधी मिळाली. त्याने विराटसोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. तसंच विराट अनुष्का लंडनमध्ये फिरतानाचा एक व्हिडिओही त्याने पोस्ट केला आहे. अरुण यादव या तरुणाने हे फोटो, व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्याने लिहिले,'आज विराट कोहलीला भेटलो. मी नशिबवान आहे की त्याच्यासोबत मला वेळ घालवता आला. हे खूपच सुखद सरप्राईज होतं. किंग आणि त्याच्या कुटुंबाला भेटल्यानंतर खूप आनंद झाला. या अविस्मरणीय दिवसासाठी खूप आभार.'
विराट-अनुष्का ही सर्वांसाठी आदर्श जोडी म्हणून लोकप्रिय आहे. कठीण असो किंवा सुखाचा काळ असो अनुष्काने नेहमीच विराटची साथ दिली. विराटने सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडला तेव्हा अनुष्काच्या चेहऱ्यावरील आनंद बघण्यासारखा होता. तसंच वर्ल्ड कप हरल्यानंतर अनुष्काने विराटला मिठी मारल्याचा फोटोही तुफान व्हायरल झाला.