मेलबर्नच्या रस्त्यावर फिरताना दिसले विराट आणि अनुष्का, व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 14:08 IST2024-12-25T14:06:04+5:302024-12-25T14:08:32+5:30
विराट कोहली आणिअनुष्का शर्मा हे मेलबर्नच्या रस्त्यावर फिरताना दिसले.

मेलबर्नच्या रस्त्यावर फिरताना दिसले विराट आणि अनुष्का, व्हिडीओ व्हायरल
Virat-Anushka In Melbourne : बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2024-25 भारतीय संघासाठी खूप खास आहे. या मालिकेचा थेट संबंध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 च्या अंतिम सामन्याशी आहे. त्यामुळे हा सामना भारताला कोणत्याही परिस्थितीत जिंकणे आवश्यक आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा सामना मेलबर्न येथे खेळवला जाणार आहे. 26 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या या महत्त्वाच्या सामन्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. सामन्यापूर्वी टीम इंडिया मेलबर्नला पोहोचली असून सराव सत्रही सुरू आहे. भारतीय क्रिकेट स्टार विराट कोहली (Virat Kohli) आणि त्याची पत्नी बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत (Anushka Sharma) मेलबर्नच्या रस्त्यावर फिरताना दिसले.
आज म्हणजेच २५ डिसेंबरला ख्रिसमसची सुट्टी आहे. अशा परिस्थितीत नाताळच्या निमित्ताने विराट कोहलीने पत्नी अनुष्का शर्मासोबत काही क्षण घालवण्याचा निर्णय घेतला. या जोडप्याच्या आउटिंगचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्याने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. दोघांची खास गोष्ट म्हणजे दोघेही मॅचिंग शर्टमध्ये दिसले.
Virat Kohli And @AnushkaSharma Spotted Strolling On The Streets Of Melbourne.🥰♥️#Virushka#INDvAUS#AUSvIND@imVkohlipic.twitter.com/bwIEnWpOSn
— virat_kohli_18_club (@KohliSensation) December 24, 2024
टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या पहिल्या सामन्यापासून अनुष्का शर्मा आपल्या मुलांसह विराट कोहलीसोबत उपस्थित आहे. पर्थमध्ये कोहलीने शतक झळकावले, तेव्हा तोही सामना पाहण्यासाठी ती आली होती. पर्थ कसोटीतील शतकानंतर विराट कोहलीने अनुष्काच्या पाठिंब्याचे कौतुक केलं होतं. विराटनं म्हटलं होतं, "अनुष्का नेहमीच माझ्यासोबत असते. परिस्थिती कशीही असो, पडद्यामागे काय होते आणि कठीण काळात मला कसे हाताळायचे हे तिला माहीत आहे".
विराट आणि अनुष्का हे कायम चर्चेत असतात. चाहत्यांनाही त्यांच्याविषयीचे प्रत्येक अपडेट जाणून घेण्याची इच्छा असते. विराट आणि अनुष्का हे नेहमी त्यांचं खाजगी आयुष्य जपताना दिसून येतात. विराट कोहली हा टीम इंडियाच्या बड्या खेळाडूंपैकी एक. प्रत्येक मोठ्या स्पर्धा आणि मालिकेसाठी त्याची निवड होणार हे ठरलेलेच असते. विराट गेली अनेक वर्षे भारतासाठी क्रिकेट खेळतोय. तर अनुष्का ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. सध्या तिनं कामातून ब्रेक घेतलला आहे.