Virat Anushka Video: एअरपोर्टवर लहान मुलांप्रमाणे वागू लागली अनुष्का शर्मा, चिडलेल्या विराटने असं संभाळली परिस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2022 12:43 PM2022-08-02T12:43:17+5:302022-08-02T12:45:06+5:30

एअरपोर्टवर अनुष्का शर्मा काही विचित्र मुलांसारखी वागताना दिसली. अनुष्काच्या अशा वागण्यामुळे विराट तिच्यावर चिडलेला दिसला.

Virat kohli brutally angry on anushka sharma for weirdness in public place virat kohli angry on anushka sharma | Virat Anushka Video: एअरपोर्टवर लहान मुलांप्रमाणे वागू लागली अनुष्का शर्मा, चिडलेल्या विराटने असं संभाळली परिस्थिती

Virat Anushka Video: एअरपोर्टवर लहान मुलांप्रमाणे वागू लागली अनुष्का शर्मा, चिडलेल्या विराटने असं संभाळली परिस्थिती

googlenewsNext

Virat Kohli Anushka Sharma Spotted Video:अनुष्का शर्मा आणि विराट कोहली व्हॅकेशन एन्जॉय करण्यासाठी लंडनला गेले होते. लंडनमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करून विराट आणि अनुष्का परतले आहेत. दोघांना नुकतेच विमानतळावर स्पॉट करण्यात आले. विराट आणि अनुष्का हे इंडस्ट्रीतील पॉवर कपलपैकी एक मानले जातात. दोघेही अनेकदा कपल गोल देत असतात. विराट आणि अनुष्काचा कोणताही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतो. 

यादरम्यान विरल भयानीने शेअर केलेल्या व्हिडीओत अनुष्का शर्मा मुलांसारखी काही विचित्र वागताना दिसली. अनुष्काच्या अशा वागण्यामुळे चाहत्यांसह विराटही थोडं आश्चर्यचकित झालेला दिसला. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, अनुष्का लहान मुलासारखी वागते आहे आणि विराट  तिची काळजी घेतो आणि तिचा मास्कही पडतो. व्हिडीओमध्ये अनुष्काही थोडीशी डगमगताना दिसली. त्यानंतर अनेकांनी तिने ड्रिंक घेतल्याचे सांगितले.

विराट अनुष्कावर चिडला
विराटने परिस्थिती पाहून अनुष्काला संभाळात तिच्यासोबत पोझ देताना दिसला आणि नंतर तिला कारमध्ये बसण्यास सांगितले. यादरम्यान विराट कोहलीच्या चेहऱ्यावर रागाचे भावही स्पष्ट दिसत आहेत.

अनेक वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर विराट आणि अनुष्का 11 डिसेंबर 2017 रोजी विवाहबंधनात अडकले. त्यानंतर गेल्या वर्षी अनुष्का शर्माने मुलगी वामिकाला जन्म दिला. अनुष्का अनेकदा वामिकासोबत स्पॉट झाली आहे. वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर, अनुष्का शर्माचा चित्रपट 'चकडा एक्सप्रेस' सप्टेंबरमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात ती महिला खेळाडू झुलन गोस्वामीच्या भूमिकेत दिसणार आहे.

Web Title: Virat kohli brutally angry on anushka sharma for weirdness in public place virat kohli angry on anushka sharma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.