अनुष्का शर्माने सोशल मीडियाद्वारे दिलाय हा खूप चांगला संदेश, सगळीकडे आहे याचीच चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2020 06:55 PM2020-04-07T18:55:00+5:302020-04-07T18:55:02+5:30
अनुष्काच्या या पोस्टची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
अनुष्का शर्माचा सोशल मीडिया कंटेट पाहिल्यास त्यावर लॉकडाऊनच्या काळात कधी कपल गोल्स तर कधी फॅमिली गोल्स पाहायला मिळतात. या अभिनेत्रीने तिचा पती विराट कोहली आणि आई-वडील, कर्नल अजय कुमार शर्मा आणि आशिमा शर्मा यांच्यासोबत बोर्डगेम (मोनोपली) खेळतानाचे सुंदर छायाचित्र सोशल मीडियावर शेअर केले आहे. आपल्या कुटुंबासमवेत संबंध दृढ करण्यासाठी या क्वारंटाईन कालावधीचा वापर करतानाचा क्षण आणि त्यासोबत हृदयस्पर्शी ओळी अनुष्काने लिहिल्या आहेत.
ती सांगते की, “आपल्या आयुष्यात सर्वप्रथम कुटुंबीयच आपली काळजी घेतात – ते आपल्याला जीवन प्रवास शिकवतात, चालायला, खायला, समाजात मिसळायला आणि त्यानंतर जगाचा सामना करायला सज्ज करतात. आपल्या प्रारंभिक जीवनाचा आपल्यावर आयुष्य संपेपर्यंत प्रभाव असतो. आजच्या काळात जगभर अस्थिरतेचे सावट दिसतेय. अशाकाळात तुमच्यापैकी अनेकांनी कुटुंबासोबतचे संबंध घट्ट झाल्याचे, आत्मीयता निर्माण झाल्याचा अनुभव घेतला असेल, असे मला खात्रीपूर्वक वाटते.”
स्वत: आणि आपल्या जिवलगांच्या सुरक्षेसाठी घरीच राहण्याचा सल्ला अनुष्काने प्रत्येकाला दिला आहे. ती सांगते, “तुमच्या जीवनात अनमोल असलेल्या प्रत्येकाची देखभाल करण्यासाठी घरीच थांबा. प्रत्येक क्षण भरभरून जगा ... हसा, जोरात हसा, शेअर करा, प्रेम व्यक्त करा, गैरसमजुती दुर करा, मजबूत/सशक्त नाते निर्माण करा, जीवनाविषयी, स्वप्नांची चर्चा करा आणि उज्ज्वल भविष्याकरिता प्रार्थना करा.”
सध्या कोविड – 19 महामारीच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण जग अतिशय चिंतेत आहे. त्यावर ती म्हणते की, “आपल्या पायाखालची जमीन सरकली आहे, आपल्या सर्वांच्या आयुष्यावर मोठा परिणाम झाला आहे. मात्र आगामी काळात आपण या परिस्थितीपासून काही धडा शिकू, ही आशा व्यक्त करते. या भयंकर महामारीचा फैलाव होण्यापूर्वी दिसत असलेले जग आणि या घटनेनंतर जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे नवा असेल ही अपेक्षा...”