आशिया कपसाठी दुबईत असलेला विराट कोहलीनं आपल्या लेडी लव्हसाठी लिहिलेली खास पोस्ट, म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2022 19:00 IST2022-09-02T18:03:49+5:302022-09-02T19:00:06+5:30
आशिया चषक 2022साठी दुबईमध्ये असलेला विराट कोहली आपली पत्नी अनुष्का शर्माला मिस करतोय. त्याने सोशल मीडियावर अनुष्काचा एक फोटो पोस्ट केला आहे.

आशिया कपसाठी दुबईत असलेला विराट कोहलीनं आपल्या लेडी लव्हसाठी लिहिलेली खास पोस्ट, म्हणाला...
Virat Kohli Post: भारतीय क्रिकेटर विराट कोहली (Virat Kohli) आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) हे इंडस्ट्रीतील पावर कपलपैकी एक आहेत. विराट आणि अनुष्का आता इंडस्ट्रीपासून दूर राहून साधे आयुष्य जगतात आणि एकमेकांना जास्तीत जास्त वेळ देतात. अनुष्का, विराटच्या आयुष्यात काय महत्त्वाचं आहे, ते त्यांनी अनेकदा व्यक्त केलं आहे.
अनुष्काला मिस करतोय विराट
आशिया चषक 2022साठी दुबईमध्ये असलेला विराट कोहली आपल्या पत्नीला किती मिस करत आहे, हे त्याच्या लेटेस्ट पोस्टवरून कळतेय. विराटने त्याच्या इंस्टाग्रामवर अनुष्का शर्माचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती क्यूट दिसत आहे. हा फोटो शेअर करताना विराटने 'My (माझं)...' असे लिहिले असून यासोबत त्याने पृथ्वी आणि हार्ट इमोजी पोस्ट केला आहे. म्हणजे विराटने अनुष्कामध्ये त्याचं जगं असल्याचं सांगितलं आहे. विराटच्या या पोस्टला त्याच्या चाहत्यांकडूनही पसंती मिळत आहे.
दरम्यान विराट आणि अनुष्का आता अलिबागकर झाले आहेत. झिराड येथील आठ एकर जमीन खरेदी-विक्रीची कागदपत्रे अलिबाग येथील सहदुय्यम निबंधक अश्विनी भगत यांच्याकडे नोंदणीकृत करण्यात आली आहेत. या जमिनीची एकूण किंमत १९ कोटी २४ लाख ५० हजार रुपये असून, यासाठी त्याने ३ लाख ३५ हजार रेडीरेकनरनुसार १ कोटी १५ लाख ४५ हजार रुपयांची स्टॅम्प ड्युटी सरकारच्या तिजोरीत जमा केली.