विराट कोहली रोज पाहतो अनुष्काचा हा एक सिनेमा, ‘त्या’ एका सीनवर तर आहे जाम फिदा!!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 08:37 PM2021-05-21T20:37:27+5:302021-05-21T20:38:43+5:30
सध्या विराटची एक मुलाखत जाम चर्चेत आहे. कारणही तसेच खास आहे. या मुलाखतीत विराट पहिल्यांदा अनुष्काच्या सिनेमांबद्दल बोलला आहे.
टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) देशातील सर्वात चर्चित कपल आहे. विराट क्रिकेट जगतात यशाच्या शिखरावर आहे तर अनुष्काच्या अभिनयाच्या दुनियेतील सुपरस्टार आहे. सध्या अनुष्काने कामातून ब्रेक घेतला असला तरी आजही ती बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. त्यामुळेच या ना त्या कारणाने दोघेही चर्चेत असतात. सध्या काय तर विराटची एक मुलाखत जाम चर्चेत आहे. कारणही तसेच खास आहे. या मुलाखतीत विराट पहिल्यांदा अनुष्काच्या सिनेमांबद्दल बोलला आहे. अनुष्काचा कोणता सिनेमा सर्वाधिक आवडतो, हे त्याने सांगितले आहे.
तर अनुष्काचा ‘ऐ दिल है मुश्किल’ हा सिनेमा विराटचा सर्वाधिक आवडता सिनेता आहे. इतका की, आजही फावल्या वेळात तो युट्यूबवर हा सिनेमा बघतो.
इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत विराट म्हणाला, ‘अनुष्काचा ऐ दिल है मुश्किल माझा आवडता चित्रपट आहे. आजही मी हा सिनेमा बघतो. या सिनेमातील एक सीन तर मी कितीही वेळा पाहू शकतो. अनेकदा मी युट्यूबवर हा सीन बघतो. अनुष्काला कॅन्सर झालेला असतो आणि रणबीर तिला पाहायला जातो, तो सीन मला फार टच करतो. या सीनची माझ्या मनात खास जागा आहे.’
ऐ दिल है मुश्किलमध्ये अनुष्काने सर्वोत्तम अभिनय केला आहे. तिने साकारलेली व्यक्तिरेखा माझी आवडती व्यक्तिरेखा आहे. तिच्या या भूमिकेचे मी कायम कौतुक करत असतो. सिनेमातला तो सीन वारंवार पाहतो, असेही त्याने सांगितले.
अलीकडे विराट व अनुष्का आईबाबा झालेत. काही महिन्यांपूर्वी अनुष्काने एका गोंडस मुलीला जन्म दिला. सध्या विराट व अनुष्का दोघेही आपल्या लाडक्या लेकीच्या संगोपनात बिझी आहेत.
लवकरच टीम इंडिया विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली इंग्लंड दौरा करणार आहे. तिथे विश्व टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी) होणार असून ते न्यूझिलंडसोबत खेळणार आहे.