‘झिरो’ पाहून भारावला विराट कोहली; म्हणाला,‘सर्वांचा अभिनय उत्तम!’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 17:37 IST2018-12-23T17:36:39+5:302018-12-23T17:37:11+5:30

या चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. कोणाला चित्रपट आवडतोय, तर कोणाची या चित्रपटाकडून निराशा झाली आहे. मात्र, विराट कोहलीने पत्नी अनुष्का शर्माचा चित्रपट आवर्जून पाहिला आणि त्यावर प्रतिक्रिया देखील दिली आहे.

Virat Kohli watch 'Zero' Movie; states 'Best of all acting!' | ‘झिरो’ पाहून भारावला विराट कोहली; म्हणाला,‘सर्वांचा अभिनय उत्तम!’

‘झिरो’ पाहून भारावला विराट कोहली; म्हणाला,‘सर्वांचा अभिनय उत्तम!’

सध्या सर्वत्र ‘झिरो’ या चित्रपटाची चर्चा सुरू आहे. वेगळे कथानक, स्टारकास्ट यांच्याबाबत विविधांगी मते समोर येत आहेत. आता तर भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहली यानेही चित्रपट पाहून त्याची प्रतिक्रिया नोंदवली आहे. काय आहे त्याची प्रतिक्रिया? अर्थात तुमच्या सगळया प्रश्नांची उत्तरं आम्ही देणार आहोत. अनुष्का शर्माची महत्वपूर्ण भूमिका असलेला 'झिरो' चित्रपट अलीकडेच प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. कोणाला चित्रपट आवडतोय, तर कोणाची या चित्रपटाकडून निराशा झाली आहे. मात्र, विराट कोहलीने पत्नी अनुष्का शर्माचा चित्रपट आवर्जून पाहिला आणि त्यावर प्रतिक्रिया देखील दिली आहे.

विराटने ट्विट करत लिहिले आहे की, 'झिरो चित्रपट खूप चांगला आहे. या चित्रपटाने पूर्ण मनोरंजन केले आहे. मला खूप आवडला. सर्वच कलाकारांनी खूप चांगले काम केले आहे. अनुष्काचे काम फार आवडले. तिचे पात्र हे आव्हानात्मक होते. तरीही तिने ते चांगल्या पद्धतीने साकारले आहे.’ विराटने याआधीही अनुष्काच्या चित्रपटावर प्रतिक्रिया देऊन नेहमीच तिला प्रोत्साहन दिले आहे. 'झिरो' मध्ये अनुष्काने शाहरुखसोबत मुख्य भूमिका साकारली आहे. अनुष्काच्या पात्रासह कॅटरिनाच्या भूमिकेलाही प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. 



 

चित्रपटाला मिळत असलेल्या एकंदर कमाईवरुन चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षांची पुर्तता करण्यात अपयशी ठरल्याचे दिसत आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाने २० कोटींची कमाई करत ओपनिंग केली. दुसऱ्या  दिवशीची कमाई १८ कोटीपर्यंत पोहोचली आहे. 

Web Title: Virat Kohli watch 'Zero' Movie; states 'Best of all acting!'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.