विराट कोहलीचा नवा लूक पाहून चाहत्यांना आठवला 'मनी हाइस्ट'मधील प्रोफेसर, व्हायरल झाला फोटो
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 01:18 PM2021-05-25T13:18:05+5:302021-05-25T13:18:36+5:30
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचा नवा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माचा नवरा विराट कोहलीचा नवीन फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. विराट आपल्या फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. सोबतच तो त्याच्या फॅशन सेन्समुळेही चर्चेत येत असतो. मात्र आता सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या त्याच्या फोटोची तुलना स्पॅनिश लोकप्रिय वेबसीरिज मनी हाइस्टमधील प्रोफेसरच्या लूकशी केली जात आहे.
नुकतेच विराट कोहलीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. या फोटोत त्याने लांब केस आणि वाढलेली दाढी आणि काळा चश्मा लावलेला दिसतो. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच ट्विटरवर चर्चा सुरू झाली की, स्पॅनिश वेबसीरिज मनी हाइस्टमधील प्रोफेसर सारखा लूक असल्याचे बोलले जाऊ लागले. विराट कोहलीचा मनी हाइस्ट लूक सोशल मीडियावर हिट झाला आहे आणि चाहते त्यावर मजेशीर मीम्स बनवत आहेत.
Professor first look from Trophy Heist. Releasing June 18 pic.twitter.com/hDksy9pdrE
— Rishabh Srivastava (@AskRishabh) May 24, 2021
त्यानंतर चाहते विचार करू लागले की, कोहलीने नवीन रूप धारण केले आहे. त्यानंतर असे समजले की फोटो एडिट केलेला होता.
Fan's on social media couldn't get enough of Virat Kohli's new quarantine look!!
— OneCricket (@OneCricketApp) May 25, 2021
The masses drew comparisons of his look with that of the "Professor" from hit series 'Money Heist'#ViratKohli#Professor#MoneyHeistpic.twitter.com/2B6fSrULDn
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा ही जोडी सातत्याने लोकांच्या मदतीसाठी पुढाकार घेत आहेत. कोरोना लढ्यात हातभार लावण्यासाठी विरुष्काने नुकतेच एका मोहीमेतून ११ कोटींचा निधी जमा केला. त्यांनी स्वतः या मोहीमेत २ कोटींची मदत केली. मागील वर्षीही लॉकडाऊनच्या काळात या दोघांनी पंतप्रधान सहाय्यता निधीत हातभार लावला होता. त्यांनी ही रक्कम जाहीर केली नसली तरी या दोघांनी तीन कोटींची मदत केल्याचे सूत्रांनी सांगितले होते. आता हे कपल पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
हैदराबाद येथील दोन वर्षांच्या मुलाला दुर्मिळ आजार झाला आहे आणि त्यावरील उपचारासाठी त्याला १६ कोटींची गरज आहे. विरूष्काने मदतीचा हात पुढे केला आहे.