बॉलिवूडमध्ये होणार आणखी एका Celebrity Kidची एन्ट्री!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2019 15:58 IST2019-01-20T15:56:23+5:302019-01-20T15:58:57+5:30
आता आणखी एक सेलिब्रिटी किड् बॉलिवूड येण्यासाठी सज्ज झाला आहे. हा स्टार किड कोण तर आसमान भारद्वाज.

बॉलिवूडमध्ये होणार आणखी एका Celebrity Kidची एन्ट्री!!
ठळक मुद्दे शाहिद कपूरचा ‘कमिने’ हा चित्रपट विशाल भारद्वाज यांनी दिग्दर्शित केला होता. आसमान या चित्रपटाचा सहायक दिग्दर्शक होता.
बॉलिवूडमध्ये गेल्या अनेक वर्षांत अनेक स्टार किड्सनी पदार्पण केले. यातील काही यशस्वी झालेत तर काही अपयशी. पण स्टार किड्सच्या बॉलिवूड पदार्पणाचा ‘सिलसिला’ अद्यापही थांबलेला नाही. आता आणखी एक सेलिब्रिटी किड् बॉलिवूड येण्यासाठी सज्ज झाला आहे. हा स्टार किड कोण तर आसमान भारद्वाज.
होय, सुप्रसिद्ध दिग्दर्शक विशाल भारद्वाज आणि गायिका रेखा भारद्वाज यांचा मुलगा आसमान बॉलिवूडमध्ये नशीब आजमावणार आहे. अर्थात अॅक्टिंगमध्ये नाही तर दिग्दर्शनात. वडिलांप्रमाणेच आसमानने दिग्दर्शनात करिअर करण्याचा निर्णय घेतला आहे. याची सुरुवात त्याने फार आधीच केली होती. शाहिद कपूरचा ‘कमिने’ हा चित्रपट विशाल भारद्वाज यांनी दिग्दर्शित केला होता. आसमान या चित्रपटाचा सहायक दिग्दर्शक होता. म्हणजेच वडिलांच्या हाताखाली आसमान तयार झाला आहे.
रेखा भारद्वाज यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आमचा मुलगा आसमान दिग्दर्शन क्षेत्रात येतोय, हे खरे आहे. तो अलीकडेच विदेशात दिग्दर्शनाचे प्रशिक्षण घेऊन भारतात परतला आहे. येत्या मे महिन्यात दिग्दर्शक म्हणून त्याला आम्ही लॉन्च करणार आहोत, असे रेखा यांनी सांगितले.
आपल्या वडिलांप्रमाणेच आसमानलाही डार्क मुव्ही आवडतात. त्यामुळेच त्याचा पहिला चित्रपट हा थ्रीलर चित्रपट असणार आहे आणि आम्ही त्याला यासाठी प्रोत्साहितचं केले आहे. तो त्याच्यातील बेस्ट देईल, हा आम्हाला विश्वास आहे. तो एक चांगला म्युझिक कंपोझरही आहे, असेही रेखा म्हणाल्या.