'मी तिला नोकरी देईन', कंगनाला थोबाडीत मारणाऱ्या CISF महिलेच्या बाजूने गायक विशाल ददलानी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2024 15:44 IST2024-06-07T15:43:48+5:302024-06-07T15:44:52+5:30
कंगनासोबत घडलेली बातमी पोस्ट करत त्याने लिहिले...

'मी तिला नोकरी देईन', कंगनाला थोबाडीत मारणाऱ्या CISF महिलेच्या बाजूने गायक विशाल ददलानी
नवनिर्वाचित खासदार कंगना राणौत (Kangana Ranaut) दिल्लीला निघत असतानाच काल चंदीगढ विमानतळावर एक प्रकार घडला. एका महिला CISF सुरक्षाकर्मीने कंगनाच्या कानशिलात लगावली. शेतकरी आंदोलनात बोलणं कंगनाला भोवलं आणि तिला चक्क सुरक्षाकर्मीनेच थोबाडीत मारली. त्या महिलेला निलंबित करण्यात आले आहे. तर दुसरीकडे बॉलिवूड संगीत दिग्दर्शक विशाल ददलानीने त्या महिलेला नोकरी देण्याचं आश्वासन दिलं आहे.
गायक, संगीत दिग्दर्शक विशाल ददलानीने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली आहे. कंगनासोबत घडलेली बातमी पोस्ट करत त्याने लिहिले, "मी हिंसेला कधीच पाठिंबा देत नाही. पण मी या CISF महिलेचा राग समजू शकतो. जर तिच्याविरोधात CISF ने कोणतीही कारवाई केली तर मी तिला नोकरी देईन. जय हिंद. जय जवान. जय किसान."
नंतर त्या महिलेला निलंबित केल्याची बातमी शेअर करत त्याने लिहिले, "परत सांगतो, Miss कौर यांना त्यांच्या नोकरीवरुन काढले तर कोणीतरी माझा तिच्याशी संपर्क करुन द्या आणि मी तिला पुन्हा नोकरी मिळेल याची मी खात्री देतो."
विशाल ददलानीने कायमच भाजपाविरोधात पवित्रा घेतला आहे. याआधीही ते दिसून आलं आहे. तर दुसरीकडे कंगनाने बॉलिवूडवर निशाणा साधत All eyes on Rafa बोलणारे हे तुमच्यासोबतही घडू शकतं अशी प्रतिक्रिया दिली आहे.