‘त्यांना शेवटचं मी भेटूही शकलो नाही’, वडिलांच्या निधनानंतर विशाल दादलानीची भावुक पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2022 05:01 PM2022-01-08T17:01:35+5:302022-01-08T17:02:11+5:30
बॉलिवूडचा प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक आणि गायक विशाल दादलानी (Vishal Dadlani)च्या वडिलांचे निधन झाले आहे.
बॉलिवूडचा प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक आणि गायक विशाल दादलानी (Vishal Dadlani)च्या वडिलांचे निधन झाले आहे. त्यांनी ८ जानेवारीला अखेरचा श्वास घेतला. विशालने सोशल मीडियावर वडिलांसोबतचा फोटो शेअर करत भावुक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत श्रद्धांजली वाहिली आहे.
विशाल दादलानीने इन्स्टाग्राम अकाउंटवर वडिलांसोबतचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने लिहिले की, ‘श्री मोती दादलानी (१२ मे १९४३ – ८ जानेवारी २०२२) मी माझ्या जवळचा मित्र, या जमिनीवरील सर्वात चांगला आणि दयाळू माणसाला रात्री गमावले आहे. मला त्यांच्यापेक्षा चांगले वडील मिळाले नसते. मी आज एक चांगला माणूस आहे ते ही फक्त त्यांच्यामुळेच. ते गेल्या ३-४ दिवसांपासून आयसीयूत होते. मात्र मी त्यांना शेवटचे भेटूही शकलो नाही. कारण मला कोरोनाची लागण झाली आहे. या कठीण काळात माझ्या आईसोबत सुद्धा नाही थांबू शकत. हे ठीक नाही. त्यांच्याशिवाय जगात कसे जगायचे हे मला माहित नाही. मी पूर्णपणे कोलमडून गेलो आहे.
विशाल दादलानीने शुक्रवारीच त्याला कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले होते. त्याने इंस्टाग्रामच्या माध्यमातून सांगितले की, त्याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. यासोबतच त्यांनी संपर्कात आलेल्या सर्व लोकांना त्यांच्या चाचण्या करून घेण्याचे आवाहनही केले होते.