'द काश्मीर अनरिपोर्टेड' डॉक्युमेंटरी लवकरच प्रदर्शित होणार, यात नवीन काय असणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2023 01:30 PM2023-04-03T13:30:42+5:302023-04-03T13:31:58+5:30
विवेक अग्निहोत्री 'द काश्मीर फाईल्स'ची फॉलोअप स्टोरी घेऊन येत आहेत.
गेल्या वर्षी २०२२ मध्ये आलेल्या 'द काश्मीर फाईल्स' (The Kashmir Files) सिनेमाचा भाग 2 ही लवकरच येणार आहे. सध्या दिग्दर्शक निर्माता विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) आगामी 'द व्हॅक्सिन वॉर' (The Vaccine War) सिनेमाबाबत चर्चेत आहेत. येत्या १५ ऑगस्ट रोजी सिनेमा रिलीज होणार होता मात्र नुकतीच रिलीज डेट बदलण्यात आली आहे. दरम्यान विवेक अग्निहोत्री 'द काश्मीर फाईल्स'ची फॉलोअप गोष्ट घेऊन येत आहेत. ही एक डॉक्युमेंटरी सिरीज असून 'द काश्मीर अनरिपोर्टेड' (The Kashmir Unreported) असं त्यांचं नाव असणार आहे.
'द काश्मीर अनरिपोर्टेड' मध्ये काय असणार?
विवेक अग्निहोत्री म्हणाले, ' काश्मीरी पंडितांच्या पलायनावेळी त्यांच्यासोबत झालेली हिंसा आणि त्याची कारणं हे अगदी खोलात जाऊन दाखवणार आहे. या डॉक्युमेंटरी सिरीजसाठी ५ वर्ष संशोधन केलं. यामध्ये काश्मीरी पंडितांच्या पलायनासंदर्भात प्रत्येक मुद्दे , समस्या आणि संशोधनाला सीरिजच्या रुपात दाखवण्यात येईल.'
ते पुढे म्हणाले, 'ही फिल्म नाही तर केवळ एक डॉक्युमेंटरी असणार आहे. पहिल्या भागात न दाखवलेलं त्यांचं संशोधन आता या डॉक्युमेंटरीमध्ये बघायला मिळेल. काश्मीरी मुद्द्यांसोबतच इतिहासाबाबतही माहिती मिळेल. काश्मीर आणि मुंबई शिवाय विदेशातही याचे शूट झाले आहे. यावर्षी मे महिन्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही डॉक्युमेंटरी रिलीज होईल.'
'द काश्मीर अनरिपोर्टेड' चं शूट अंतिम टप्प्यात आलं आहे. लास्ट शेड्यूलचं शूट सुरु आहे. याशिवाय 'द व्हॅक्सिन वॉर' हा सिनेमा त्या महिलांवर आधारित आहे ज्यांच्यामुळे भारतात सर्वांना कोरोनाचे लसीकरण करणे शक्य झाले होते. हा सिनेमा १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार होता मात्र त्याच आसपास दोन बिग बजेट फिल्म सनी देओलचा 'गदर २' (Gadar 2) आणि रणबीर कपूरचा 'अॅनिमल' (Animal) रिलीज होत आहे. त्यामुळे कमी बजेटमध्ये बनलेल्या 'द व्हॅक्सिन वॉर'ची रिलीज त्यांनी बदलली. या दोन्ही प्रोजेक्टनंतर विवेक अग्निहोत्री 'द दिल्ली फाईल्स' वर काम करण्यास सुरुवात करतील.