इतकी अश्लीलता कुठून आणता ? 'बेशरम रंग' गाण्यावर विवेक अग्निहोत्रींचे ट्विट; 'सेक्युलर असाल तर बघू नका '

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2022 03:35 PM2022-12-29T15:35:48+5:302022-12-29T15:36:46+5:30

काश्मीर फाईल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीने (Vivek Agnihotri) गाण्यावर टीका केली आहे. हे गाणे अश्लील असून ते न बघण्याचा सल्ला त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिला आहे.

vivek-agnihotri-tweet-on-besharam-rang-song-pathaan-says-if-you-are-secular-dont-see-this-video | इतकी अश्लीलता कुठून आणता ? 'बेशरम रंग' गाण्यावर विवेक अग्निहोत्रींचे ट्विट; 'सेक्युलर असाल तर बघू नका '

इतकी अश्लीलता कुठून आणता ? 'बेशरम रंग' गाण्यावर विवेक अग्निहोत्रींचे ट्विट; 'सेक्युलर असाल तर बघू नका '

googlenewsNext

Vivek Agnihotri : शाहरुख खानच्या पठाण (Pathaan) सिनेमातील बेशरम रंग (besharam Rang) गाण्यावरुन होणारा वाद थांबण्याचे नावच घेत नाही. काश्मीर फाईल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीने (Vivek Agnihotri) गाण्यावर टीका केली आहे. हे गाणे अश्लील असून ते न बघण्याचा सल्ला त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिला आहे.

विवेक अग्निहोत्री यांनी ट्विट करत लिहिले, ' सावधान ! बॉलिवुडच्या विरोधात व्हिडिओ. जर तुम्ही सेक्युलर असाल तर बघू नका.' दोन व्हिडिओ त्यांनी ट्विटमध्ये एकत्र शेअर केले आहेत. एका व्हिडिओत बेशरम रंग गाणं सुरु आहे तर दुसऱ्या व्हिडिओत एक अॅड फिल्म आहे ज्यामध्ये बलात्कार, सांस्कृतिक हल्ला, पोर्नोग्राफी दाखवणाऱ्या सिनेमे, सिरीज यांच्यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. आपल्या संस्कृतीला वाचवण्याची प्रार्थना केली आहे.

व्हिडिओ मध्ये एक मुलगी फिल्ममेकर ला रडत रडत विचारते, एवढी अश्लीलता तुम्ही कुठून आणता ? याला तुम्ही कंटेंट म्हणता ? तुम्ही तर अपराध्यांना प्रोत्साहन देत आहात आणि यामध्ये मुलींचा बळी जातो. अशा फिल्म्सची निर्मिती न करण्याची मागणी व्हिडिओतून केली आहे.

विवेक अग्निहोत्रींनी ही पोस्ट केल्यानंतर त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे. त्यांनीच बनवलेल्या बोल्ड सिनेमांचे फोटो नेटकरी कमेंटमध्ये पोस्ट करत आहेत. 

Web Title: vivek-agnihotri-tweet-on-besharam-rang-song-pathaan-says-if-you-are-secular-dont-see-this-video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.