विवेक अग्निहोत्रीची मोठी घोषणा, 'व्हॅक्सीन वॉर'च्या एका तिकिटावर एक तिकीट फ्री
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2023 06:55 PM2023-10-01T18:55:00+5:302023-10-01T18:59:45+5:30
‘द व्हॅक्सिन वॉर’ निर्मात्यांनी प्रेक्षकांना थिएटरकडे आकर्षित करण्यासाठी तिकिटांवर ऑफर्स जाहीर केल्या आहेत.
‘द व्हॅक्सिन वॉर’ हा चित्रपट 28 सप्टेंबर रोजी सर्वत्र झाला. ‘द व्हॅक्सिन वॉर’ या चित्रपटाचं कथानक कोरोना काळ आणि लस यावर आधारित आहे. विवेक अग्निहोत्रीच्या ‘द वॅक्सीन वॉर’ या चित्रपटाची बरीच चर्चा झाली होती. या चित्रपटाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रीमियरही झाला होता. पण चित्रपटगृहात या चित्रपटाला प्रेक्षक मिळत नाहीत. आता चित्रपटाच्या कमाईत घट होत आहे. अशा परिस्थितीत प्रेक्षकांना थिएटरकडे आकर्षित करण्यासाठी निर्मात्यांनी एक नवीन युक्ती लढवली असून तिकिटांवर ऑफर्स जाहीर केल्या आहेत.
दोस्तों, आज रविवार और गांधी जयंती की छुट्टी के मौक़े पे सपरिवार #TheVaccineWar देखने जायें और एक टिकट FREE पायें यह free टिकट आप अपने घर की maid या किसी महिला/कन्या को दें। उन्हें और आपको आनंद मिलेगा। pic.twitter.com/TSbIficDKp
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) October 1, 2023
विवेक अग्निहोत्री यांनी 'द व्हॅक्सिन वॉर' या सिनेमाची एका तिकीटावर एक फ्री अशी ऑफर ठेवली आहे. सोशल मीडियावर पोस्टमध्ये लिहिले की,"मित्रांनो, आज रविवार आणि गांधी जयंतीच्या सुट्टीच्या निमित्ताने, तुमच्या कुटुंबासोबत #TheVaccineWar पाहा आणि मोफत तिकीट मिळवा. हे मोफत तिकीट तुमच्या घरातील मोलकरीण किंवा कोणत्याही स्त्री/मुलीला द्या. तुम्हालाही आनंद मिळेल". विवेक अग्निहोत्री यांनी 'द व्हॅक्सिन वॉर' या सिनेमाचं पोस्टर शेअर केलं. या पोस्टरवर 'नारी शक्ती ही भारत शक्ती है' असं लिहिलेलं दिसत आहे.
'जवान', 'गदर' आणि 'फुकरे ३' थिएटरमध्ये जोरात सुरू आहेत. अशा परिस्थितीत 'द व्हॅक्सिन वॉर'च्या कमाईवर परिणाम होण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन निर्मात्यांनी जवानाच्या तिकिटावर ऑफर देऊन प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. आता निर्मात्यांची ही कल्पना 'द व्हॅक्सिन वॉर'चे कलेक्शन वाढवते की नाही हे पाहणे कमालीचे ठरेल.
'द व्हॅक्सिन वॉर' हा सिनेमा 28 सप्टेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. भारतानेच नव्हे, तर अवघ्या देशाने कोरोना विषाणूचं महाभयंकर रूप पाहिलं आहे. जगभरात धुमाकूळ घातलेल्या या विषाणूने सगळ्यांनाच हादरवून सोडलं होतं. एकीकडे डॉक्टर्स या विषाणूशी लढा देत असताना शास्त्रज्ञ मात्र या विषाणूला नष्ट करणारी लस शोधण्यासाठी जीवाची बाजी लावून काम करत होते. याचंच चित्रण ‘द व्हॅक्सिन वॉर’ या चित्रपटात करण्यात आलं आहे. विवेक अग्निहोत्री यांनी 'द व्हॅक्सिन वॉर'मधून भारतीय शास्त्रज्ञांनी बनवलेल्या लसीचा प्रवास दाखवला आहे.
'द व्हॅक्सिन वॉर' या सिनेमात नाना पाटेकर, पल्लवी जोशी, रायमा सेन, अनुपम खेर, गिरिजा ओक, निवेदिता भट्टाचार्य, सप्तमी गौडा आणि मोहन कपूर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. विवेक अग्निहोत्रीने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. हिंदी, इंग्रजी, तेलुगू, तामिळ, मल्याळम, कन्नड, भोजपुरी, पंजाबी, गुजराती, मराठी आणि बंगाली अशा दहा भाषांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे.