‘सौदागर’चा हा ‘सुपरस्टार’ आज करतोय हे काम !
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2019 01:38 PM2019-08-09T13:38:06+5:302019-08-09T13:39:22+5:30
एका सिनेमाने स्टार झालेत आणि तितक्याच अचानकपणे फिल्म इंडस्ट्रीतून गायब झालेले अनेक स्टार्स आहेत. असाच एक स्टार म्हणजे विवेक मुशरान. होय, ‘सौदागर’ चित्रपटातील तोच तो चॉकलेटी हिरो.
एका सिनेमाने स्टार झालेत आणि तितक्याच अचानकपणे फिल्म इंडस्ट्रीतून गायब झालेले अनेक स्टार्स आहेत. असाच एक स्टार म्हणजे विवेक मुशरान. होय, ‘सौदागर’ चित्रपटातील तोच तो चॉकलेटी हिरो.
28 वर्षांपूर्वी विवेकने ‘सौदागर’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. या चित्रपटातील त्याचा निरागस चेहरा आणि जबरदस्त अभिनयाने तो एका रात्रीत स्टार झाला. यानंतर त्याच्याकडे निर्मात्यांची रांग लागली. पण एकवेळ अशीही आली की, त्याच्या चित्रपटाकडे प्रेक्षक फिरकेनासे झालेत आणि या हिरोवर साईड रोल करण्याची वेळ आली. आज विवेक मुशरानची आठवण होण्याचे कारण म्हणजे, आज (9 ऑगस्ट) त्याचा वाढदिवस.
‘सौदागर’ चित्रपटात विवेक आणि मनीषा कोईराला यांच्यावर चित्रीत ‘ईलू ईलू’ हे गाणे सुपरडुपर हिट झाले होते. पण या चित्रपटानंतर त्याच्या आयुष्याने अशी काही कलाटणी घेतली की, त्याला काम मिळणे कठीण झाले.
‘सौदागर’ सुपरहिट झाल्यानंतर विवेकने एका वर्षांत तीन-तीन चित्रपट केलेत. पण या चित्रपटांना ‘सौदागर’सारखे यश मिळू शकले नाही आणि विवेकचे स्टारडम धोक्यात आले आणि यानंतर अचानक तो इंडस्ट्रीतून गायब झाला.
2000 मध्ये ‘अंजाने’ या चित्रपटातून त्याने कमबॅक केले. पण तोही फ्लॉप ठरला. नाही म्हणायला अलीकडे आलेल्या तमाशा, पिंक, बेगम जान, वीरे दी वेडिंग या चित्रपटात तो झळकला. पण त्याच्या वाट्याला अगदीच छोट्या भूमिका आल्यात. चित्रपट फ्लॉप होऊ लागल्यानंतर विवेकने छोट्या पडद्याकडे मोर्चा वळवला. सोनपरी, परवरिश, निशा और उसके कजिन्स या मालिकेत त्याने काम केले.
एकेकाळी लीड हिरो म्हणून दिसणारा विवेक आज स्क्रीन कणी वडिलांच्या तर कधी सहाय्यक भूमिका साकारतो आहे. विशेष म्हणजे, त्याच्याच वयाचे अनेक अभिनेते आजही चित्रपटात लीड रोल साकारत आहेत. पण विवेकचे स्टारडम कधीच संपले आहे. गत 28 वर्षांत त्याच्या लूकमध्येही मोठा बदल झाला आहे.