'आता सगळं संपलं'; बऱ्याच वर्षानंतर ऐश्वर्या रायसोबतच्या ब्रेकअपवर विवेक ओबेरॉयने सोडलं मौन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2023 03:49 PM2023-05-16T15:49:08+5:302023-05-16T15:49:42+5:30
Vivek oberoi: ऐश्वर्यावरुन सलमान आणि विवेकमध्ये जोरदार भांडणं झालं होतं. अलिकडेच विवेकने एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने ऐश्वर्या आणि त्याच्या नातेसंबंधांवर भाष्य केलं.
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) हिचं नाव घेतलं की तिच्या फिल्मी करिअरसोबतच तिच्या अफेअर्सचीही चर्चा होते. अभिनेता अभिषेक बच्चनसोबत लग्न करण्यापूर्वी ऐश्वर्याचं नाव सलमान खान (Salman Khan) आणि विवेक ओबेरॉयसोबत (Vivek Oberoi) जोडलं होतं. या दोन्ही अभिनेत्यांना ऐश्वर्याने डेट केलं होतं. मात्र, त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही. यामध्येच ऐश्वर्यावरुन सलमान आणि विवेकमध्ये जोरदार भांडणं झालं होतं. अलिकडेच विवेकने एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने ऐश्वर्या आणि त्याच्या नातेसंबंधांवर भाष्य केलं.
एकेकाळी सलमानला डेट करत असलेल्या ऐश्वर्याची विवेकसोबत जवळीक होत होती. या गोष्टीचा सलमानच्या मानात प्रचंड राग होता. ज्यामुळे त्याने मोठा गोंधळ घातला होता. इतकंच नाही तर त्याने विवेकवर हातही उचलला होता. या प्रकरणानंतर विवेकनेही खुलेआम सलमानवर आरोप-प्रत्यारोप केले होते. याचा परिणाम, विवेकच्या करिअरवरही झाला. ज्याविषयी त्याने या मुलाखतीत भाष्य केलं.
“मी अशा परिस्थितीतून गेलो आहे ज्या काळात एक संपूर्ण लॉबी माझ्या विरोधात काम करत होती. अनेक सामर्थ्यशाली लोक मला खाली खेचण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी मी ‘शूटआउट ॲट लोखंडवाला’ या सिनेमाचं चित्रीकरण करत होतो. या सिनेमासाठी माझी खूप प्रशंसा झाली आणि मला अनेक पुरस्कारही मिळाले. परंतु, तरीदेखील मला कोणतं काम मिळत नव्हतं, असं विवेक म्हणाला. यानंतर विवेकला ऐश्वर्याविषयी प्रश्न विचारण्यात आला. ऐश्वर्या रायमुळे तुझ्या व्यावसायिक जीवनावर काही परिणाम झाला का? असा प्रश्न त्याला विचारण्यात आला होता.
पुढे तो म्हणतो, "मी आता या मुद्द्यावर काही बोलणार नाही. कारण, आता सगळं काही संपलं आहे. पण, मला प्रत्येक तरुणांना सांगायचंय की आपल्या आजुबाजूला सगळं हे घडत असतं. तुमची इमेज डॅमेज करण्याचा प्रयत्न केला जातो. पण, जर तुम्ही तुमच्या कामाशी एकनिष्ठ असाल तर कोणी तुमचं नुकसान करु शकत नाही. समोर येणाऱ्या समस्यांना घाबरु नका. तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा."