या अभिनेत्याने मास्कला बनवले स्लीप मास्क आणि विमानात काढली डुलकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2021 06:14 PM2021-02-01T18:14:51+5:302021-02-01T18:15:48+5:30
या अभिनेत्यानेच त्याचा हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
विवेक ऑबेरॉय सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. तो त्याच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर फोटो, व्हिडिओ पोस्ट करत असतो. त्याने त्याच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर नुकताच एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत आपल्याला तो विमानात बसलेला दिसत असून त्याच्या तोंडासोबतच डोळ्यावर देखील मास्क आपल्याला दिसत आहे.
विवेकने या फोटोसोबत लिहिले आहे की, देसी जुगाड, मास्क आणि स्लीप मास्क... तसेच त्याने या फोटोसोबत आणखी एक कॅप्शन लिहिली आहे. त्या कॅप्शनवर सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. त्याने लिहिले आहे की, मी जगातील सगळ्यात सुंदर महिलेसोबत सध्या आहे. तुम्ही सांगा कोण आहे ती?
विवेकच्या या पोस्टवर सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. काही जणांनी या पोस्टवर तू ऐश्वर्या रायसोबत आहेस का असे विचारले आहे तर काहींनी तू तुझ्या पत्नीसोबत आहे असे लिहिले आहे. एकेकाळी ऐश्वर्या आणि विवेकच्या अफेअरची मीडियात चर्चा रंगली होती. त्यावरूनच ऐश्वर्याच्या नावाने नेटिझन्स त्याला चिडवत आहेत. विवेकची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली असून केवळ काहीच तासांत ५० हजाराहून लोकांनी या पोस्टवर लाईक केले आहे. तसेच त्याचे फॅन्स या पोस्टवर भरभरून कमेंट देखील करत आहेत.
ऐश्वर्या आणि विवेक दोघांचे अफेअर असल्याच्या चर्चा मीडियात रंगल्या होत्या. मात्र ऐश्वर्याने कधीच विवेक ओबरॉयसह प्रेमाची कबुली दिली नव्हती. विवेकने अप्रत्यक्षपणे या गोष्टीविषयी मीडियात सांगितले होते. त्यांच्यात सगळे काही सुरळीत असताना विवेकच्या एका चुकीने त्या दोघांच्या नात्यात दुरावा आला. विवेकने एक पत्रकार परिषद बोलावली होती आणि त्यात त्याने थेट सलमानवर आरोप केला होता. सलमानने त्याला फोनवरून मारण्याची धमकी दिली असे त्याने या पत्रकार परिषदेत सांगितले होते. या सगळ्यामुळे चांगलाच वाद रंगला होता. पण या सगळ्यात माझा काहीही संबंध नसल्याचे ऐश्वर्याने मीडियाला सांगितले होते आणि तेव्हापासून तिने विवेकसोबत बोलणेच बंद केले. त्यानंतर विवेकने प्रियांकासह 2011 मध्ये लग्न केले. दोघांना दोन मुलं असून विवान आणि अमेया असे या मुलांची नावं आहेत.