पहिलं प्रेम... कॅन्सरमुळे गर्लफ्रेंडचा मृत्यू, नंतर ऐश्वर्या रायसोबत अफेअर; कोण आहे 'हा' अभिनेता!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 13:41 IST2024-12-26T13:41:07+5:302024-12-26T13:41:57+5:30
कॅन्सरमुळे गर्लफ्रेंड गमवल्यानं खचला होता 'हा' अभिनेता, नंतर ऐश्वर्या राय आली आयुष्यात! पण, तेही नातं टिकलं नाही.

पहिलं प्रेम... कॅन्सरमुळे गर्लफ्रेंडचा मृत्यू, नंतर ऐश्वर्या रायसोबत अफेअर; कोण आहे 'हा' अभिनेता!
बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय (Vivek Oberoi) याने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनात आपली वेगळीच जागा निर्माण केली. अभिनयासह वैयक्तिक आयुष्यामुळे कायमच तो चर्चेत असतो. त्याचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे अभिनेत्याबद्दल जाणून घेण्यास त्याचे चाहते कायमच उत्सुक असतात. नुकतंच अभिनेत्यानं त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी मोठा खुलासा केलाय.
विवेकचा संघर्षमय प्रवास राहिला आहे. ऐककाळ असा होता जेव्हा तो त्याच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळातून जात होता. जेव्हा त्याच्या प्रेयसीचा कॅन्सरमुळे मृत्यू झाला. विवेकनं तिच्यावर खरं प्रेम केलं होतं. त्यामुळे त्याच्यासाठी हा धक्का पचवणे अतिशय कठीण होते. मात्र तो डगमगला नाही, त्याने त्या काळातून स्वत:ला सावरत एक उंच झेप घेऊन दाखवली.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विवेकने खुलासा केला, की त्याने वयाच्या १७ व्या वर्षी बालपणीची पहिली मैत्रीण कॅन्सरने गमावली. विवेक म्हणाला, 'मला वाटलं होतं आम्ही एकत्र कॉलेजला जाऊ, लग्न करू. आम्ही पाच ते सहा वर्षे रिलेशनशिपमध्ये होतो आणि ती माझी ड्रीम गर्ल होती. पण, ती लिम्फोब्लास्टिक ल्युकेमियाच्या शेवटच्या टप्प्यात होती. सर्वतोपरी प्रयत्न करूनही दोन महिन्यांतच तिचे निधन झाले. मी तुटलो होतो".
विवेकच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, अभिनेता रोहित शेट्टीच्या 'इंडियन पोलिस फोर्स'मध्ये शेवटचा दिसला होता. या शोमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा आणि शिल्पा शेट्टी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. ही सीरिज सध्या सध्या प्राइम व्हिडिओवर उपलब्ध आहे. दरम्यान, विवेक सध्या प्रियंका अल्वासोबत सुखी संसार करतोय. लग्नापुर्वी त्याचं नाव अभिनेत्री ऐश्वर्याशी जोडलं गेलं होतं. अनेकदा दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आलं होतं. पण, ते नात जास्त काळ टिकलं नाही.