ऐकले का? विवेक ओबेरॉयमुळे संजय दत्तला मिळाला ‘मुन्नाभाई एमबीबीएस’!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2019 06:00 AM2019-04-12T06:00:00+5:302019-04-12T06:00:03+5:30
सन २००३ मध्ये प्रदर्शित ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ हा चित्रपट बॉलिवूडच्या ब्लॉकबस्टर चित्रपटांपैकी एक आहे. आयुष्याच्या एका वळणावर संजय दत्तचे फिल्मी करिअर सावरणारा हा चित्रपट इतका गाजला की, या चित्रपटाने संजयला सुपरस्टार बनवले. हा चित्रपट आठवायचे कारण म्हणजे, अभिनेता विवेक ओबेरॉयने केलेला ताजा खुलासा.

होय, अलीकडे एका ताज्या मुलाखतीत विवेकने हा खुलासा केला. त्यानुसार, ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ हा चित्रपट सर्वप्रथम विवेकला ऑफर केला गेला होता. ‘राजकुमार हिरानी यांनी सर्वप्रथम मला ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ ऑफर केला होता. पण त्यावेळी माझ्याकडे तारखा नव्हत्या. त्यामुळे ही भूमिका संजय दत्तला मिळाली. मला या चित्रपटाची स्क्रिप्ट प्रचंड आवडली होती. पण माझ्याकडे तारखा नव्हत्या. कदाचित हा चित्रपट संजय दत्तच्याच नशीबात होता,’ असे विवेकने सांगितले.
‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या चित्रपटाने २००४ साली राष्ट्रीय पुरस्कार जिंकला होता. केवळ इतकेच नाही तर अनेक पुरस्कार सोहळ्यात धूम करणा-या या चित्रपटाने संजयच्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी दिली होती. ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ प्रदर्शित होण्यापूर्वी मुंबई बॉम्बस्फोटात संजयचे नाव समोर आले आणि तो तुरुंगात गेला. या तुरुंगवासानंतर संजयचे फिल्मी करिअर संपले, असे मानले जाऊ लागले होते. पण ‘मुन्नाभाई एमबीबीएस’मधून त्याने धमाकेदार वापसी केली आणि लोकांमधील त्याची प्रतीमा बदलण्यासही या चित्रपटाने त्याला मदत केली.
२००६ मध्ये ‘लगे रहो मुन्नाभाई’ या नावाने ‘मुन्नाभाई एमबीबीएस’चा सीक्वल आला. यातही संजय दत्त लीड रोलमध्ये दिसला. या दोन्ही चित्रपटांनी बक्कळ कमाई केली. लवकरच या सीरिजचा तिसरा चित्रपट येणार असल्याची चर्चा आहे. अर्थात अद्याप याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही.