विवेक ओबेरॉयला करायचा रोमॅण्टिक चित्रपट!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2017 01:53 PM2017-06-01T13:53:59+5:302017-06-01T19:23:59+5:30

आतापर्यंत अ‍ॅक्शन अन् कॉमेडी चित्रपटात बघावयास मिळालेल्या अभिनेता विवेक ओबेरॉयला आता दमदार रोमॅण्टिक चित्रपटात काम करायचे आहे. यासाठी तो ...

Vivek Oberoi romantic movie! | विवेक ओबेरॉयला करायचा रोमॅण्टिक चित्रपट!

विवेक ओबेरॉयला करायचा रोमॅण्टिक चित्रपट!

googlenewsNext
ापर्यंत अ‍ॅक्शन अन् कॉमेडी चित्रपटात बघावयास मिळालेल्या अभिनेता विवेक ओबेरॉयला आता दमदार रोमॅण्टिक चित्रपटात काम करायचे आहे. यासाठी तो एका दमदार व सर्वोत्कृष्ट लव्ह स्टोरीच्या शोधात आहे. बºयाच कालावधीनंतर एका कॉमेडी चित्रपटातून पुनरागमन करणाºया विवेकने ही इच्छा व्यक्त केली. 

वास्तविक २००२ मध्ये विवेक ‘साथियॉ’ या चित्रपटात अभिनेत्री राणी मुखर्जी हिच्यासोबत बघावयास मिळाला होता. हा चित्रपटात एका लव्ह स्टोरीवर आधारित होता. चित्रपटात विवेकने साकारलेल्या आदित्यच्या भूमिकेचे त्यावेळी खूपच कौतुक केले गेले होते. मात्र या भूमिकेनंतर तो पुन्हा कधीही रोमॅण्टिक चित्रपटात बघावयास मिळाला नाही. त्यामुळेच त्याला रोमॅण्टिक चित्रपट करायचा आहे. 

विवेकने ‘कंपनी’ या अंडरवर्ल्डशी संबंधित चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. या चित्रपटाचे दिग्दर्शन राम गोपाल वर्मा यांनी केले होते. जेव्हा विवेकला, ‘तू रोमॅण्टिक चित्रपटांपासून दूर जात आहेस काय?’ असे विचारण्यात आले तेव्हा त्याने, मी दूर जात नसून मला रोमॅण्टिक चित्रपटात काम करण्याची तीव्र इच्छा असल्याचे म्हटले. पुढे बोलताना विवेक म्हणाला की, मी रोमॅण्टिक कथेच्या शोधात आहे. अशाप्रकारच्या चित्रपटात मी अधिक परिपक्वतेने भूमिका साकारू शकतो, याचा मला विश्वास असल्याचे त्याने म्हटले. 

सध्या विवेक एका कॉमेडी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्याचबरोबर तो गेल्या काही दिवसांपासून त्याच्या सामाजिक कार्यामुळेही चर्चेत आहे. त्याने शहिदांच्या कुटुंबीयांना ठाणे येथे २५ फ्लॅट देऊ केले आहेत. त्यातील काही फ्लॅटचे वाटपही केले आहे. त्याचबरोबर अ‍ॅसिड हल्ल्यातील एका पीडितेच्या लग्नात अचानक हजेरी लावून तिला फ्लॅट गिफ्ट केला होता. 

Web Title: Vivek Oberoi romantic movie!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.