‘पीएम नरेंद्र मोदी’च्या रिलीजपूर्वी विवेक ओबेरॉयला धमक्यांचे फोन, पण का?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 10:08 AM2019-05-23T10:08:55+5:302019-05-23T10:09:03+5:30

बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय लवकरच ‘पीएम नरेंद्र मोदी’ या बायोपिकमध्ये पीएम नरेंद्र मोदींची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. येत्या शुक्रवारी हा चित्रपट प्रदर्शित होतोय.  पण तत्पूर्वी विवेक ओबेरॉयच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

vivek oberoi threatens mumbai police enhanced security | ‘पीएम नरेंद्र मोदी’च्या रिलीजपूर्वी विवेक ओबेरॉयला धमक्यांचे फोन, पण का?

‘पीएम नरेंद्र मोदी’च्या रिलीजपूर्वी विवेक ओबेरॉयला धमक्यांचे फोन, पण का?

googlenewsNext
ठळक मुद्दे‘पीएम नरेंद्र मोदी’ या बायोपिकशिवाय विवेक सध्या आपल्या एका वादग्रस्त ट्वीटमुळेही चर्चेत आहे. विवेकने आपल्या सोशल अकाऊंटवर एक्झिट पोलच्या पार्श्वभूमीवरचे एक मीम्स शेअर केले होते. पण त्याचे हे ट्वीट पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय लवकरच ‘पीएम नरेंद्र मोदी’ या बायोपिकमध्ये पीएम नरेंद्र मोदींची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. येत्या शुक्रवारी हा चित्रपट प्रदर्शित होतोय.  पण तत्पूर्वी विवेक ओबेरॉयच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. होय, सध्या विवेक ‘पीएम नरेंद्र मोदी’या बायोपिकचे आक्रमक प्रमोशन करतोय आणि याचमुळे त्याला जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. धमकींचे फोन आल्यानंतर विवेकने पोलिसांना याबाबत सूचना दिली. यानंतर पोलिसांनी विवेकच्या सुरक्षेत वाढ केली आहे. मुंबई पोलिसांच्या प्रोटेक्शन सेलनेही गुप्तचर यंत्रणेच्या माहितीनंतर विवेकला सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे.


प्राप्त माहितीनुसार, ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटात विवेक पीएम मोदींची व्यक्तिरेखा साकारतोय. याचमुळे त्याला धमक्या मिळत आहेत. या धमक्या बघता यापुढे काही दिवस विवेकच्या सुरक्षेत दोन कॉन्स्टेबल तैनात असणार आहेत.
‘पीएम नरेंद्र मोदी’ या बायोपिकशिवाय विवेक सध्या आपल्या एका वादग्रस्त ट्वीटमुळेही चर्चेत आहे. विवेकने आपल्या सोशल अकाऊंटवर एक्झिट पोलच्या पार्श्वभूमीवरचे एक मीम्स शेअर केले होते. पण त्याचे हे ट्वीट पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. कारण हे ट्वीट आणि हे मीम शेअर करताना त्याने केवळ एक्झिट पोलचीच नाही तर ऐश्वर्या राय बच्चन हिचीही खिल्ली उडवली होती.

 विवेकने ट्वीट केलेल्या मीम्समध्ये तीन फोटो होते. यातील पहिल्या सर्वात वरच्या फोटोत सलमान खान आणि ऐश्वर्या राय होते. या फोटोला ‘ओपिनियन पोल’ असे कॅप्शन देण्यात आले आहे होते. दुसºया फोटोत ऐश्वर्या विवेक ओबेरॉयसोबत होते. याला‘एक्झिट पोल’ असे लिहिलेले होते. तिसºया फोटोत ऐश्वर्या राय बच्चन, अभिषेक बच्चन व आराध्याचा फोटो होता आणि यावर ‘रिझल्ट’ असे लिहिले होते. यावरून त्याच्यावर टीकेची झोड उठली होती. यानंतर विवेकला माफी मागावी लागली होती.

Web Title: vivek oberoi threatens mumbai police enhanced security

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.