'छोटा भीम कुंफु धमाका'चे अँथम साँग दलेर मेहंदीच्या आवाजात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2019 06:29 PM2019-04-11T18:29:33+5:302019-04-11T18:34:31+5:30

भारतातील सर्वाधिक लोकप्रिय अ‍ॅनिमेटेड कॅरेक्टर छोटा भीम लवकरच चित्रपट स्वरूपात आपल्या चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

In the voice of Daler Mehndi in 'Chhota Bheem Kunfu Dhamaka', | 'छोटा भीम कुंफु धमाका'चे अँथम साँग दलेर मेहंदीच्या आवाजात

'छोटा भीम कुंफु धमाका'चे अँथम साँग दलेर मेहंदीच्या आवाजात

googlenewsNext

भारतातील सर्वाधिक लोकप्रिय अ‍ॅनिमेटेड कॅरेक्टर छोटा भीम लवकरच चित्रपट स्वरूपात आपल्या चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. 'छोटा भीम कुंग फु धमाका' असे त्या चित्रपटाचे नाव असून तो थ्री डी स्वरूपात दाखवला जाणार आहे. या चित्रपटामध्ये दुसरे तिसरे कोणी नसून, फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध पॉप गायक दलेर मेहंदी यांनी गाणे गायले आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षक नक्कीच एन्जॉय करतील अशी खात्री आहे.

या चित्रपटातील गाण्याबद्दल बोलताना दलेर मेहंदी म्हणतात, 'या गाण्याची खासियत म्हणजे हे गाणे छोटा भीमवर आधारित आहे. जो कायम खलनायकांपासून आपल्या मित्रांचे संरक्षण करत असतो. तर या गाण्याचे संगीतकार सुनील कौशिक आहेत. ऊर्जा आणि पंपिंग पॅक असलेले हे गाणे छोटा भीमच्या प्रतिमेचे वैशिष्ट्य ठरत आहे. हे प्रमोशनल गाणे प्रेक्षकांना नक्कीच आवडेल कारण यातून छोटा भीम आणि त्याच्या मित्रांच्या मैत्रीतली ताकत आपल्याला दिसून येते.' 


दलेर मेहंदी यांनी पुढे सांगितले, 'छोटा भीम हे आजच्या लहान पिढीचे आकर्षण आहे. मला या चित्रपटासाठी गाणे गायला मिळाले यातच मला खूप आनंद आहे. माझी ५ वर्षीय मुलगी रुबाब ही सुद्धा छोटा भीमची खूप मोठी चाहती आहे. तीसुद्धा या गाण्यात दिसणार आहे. वास्तविकरित्या एका फिचर फिल्ममध्ये अशाप्रकारे गाण्यावर चित्रित व्हिडिओ हा आमचा पहिलाच प्रयोग आहे आणि हा प्रयोग यशस्वीरीत्या सुपरहिट करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. या गाण्यातील एनर्जी लहान मुलांसहित मोठ्यांनाही थिरकायला लावणारी आहे. मला खात्री आहे कि सगळेच याचा आनंद नक्कीच घेतील.'
या चित्रपटाचे दिग्दर्शक राजीव चिलाका म्हणतात, 'या चित्रपटामध्ये दलेर मेहंदी यांनी गायलेले गाण्यासाठी आम्ही खूपच उत्सुक आहोत. या गाण्याची रेकॉर्डिंग संपली असून याचा म्युझिक व्हिडिओसुद्धा बनवण्याची योजना आम्ही करत आहोत. या गाण्यासाठी दलेरजींनी जबरदस्त काम केले आहे आणि मला विश्वास आहे की हे गाणे मुलांना खूपच आवडेल.'


'छोटा भीम कुंफू धमाका' या चित्रपटात भीम आणि त्याचे मित्र चीनमध्ये जगातील सर्वात मोठ्या कुंफू स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी जातात. मात्र भीमला चीनच्या राजकुमारीला दृष्ट जुहूनपासून वाचवण्यासाठी बोलावले गेल्यामुळे कशाप्रकारे त्या स्पर्धेत अडथळे निर्माण होतात, यावर आधारीत चित्रपटाची कथा आहे.
राजीव चिलका आणि बिनायक दास दिग्दर्शित ग्रीन गोल्ड ऍनिमेशन द्वारा निर्मित आणि यश राज द्वारा वितरित "छोटा भीम कुंफू धमाका" हा चित्रपट १० मे २०१९ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: In the voice of Daler Mehndi in 'Chhota Bheem Kunfu Dhamaka',

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.