वाणी पडली ‘प्रेमात’
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2016 10:14 AM2016-06-25T10:14:45+5:302016-06-25T15:44:45+5:30
वाणी कपूर सध्या कोणाच्या तरी प्रेमात पडली आहे. ती काही कोण्या स्टारच्या किंवा व्यक्तीच्या प्रेमात नाही तर जगातील ‘मोस्ट ...
ती काही कोण्या स्टारच्या किंवा व्यक्तीच्या प्रेमात नाही तर जगातील ‘मोस्ट रोमॅण्टिक सिटी’ अशी बिरुदावली मिरवणाऱ्या पॅरिसच्या प्रेमात पडली आहे.
आदित्य चोपडा दिग्दर्शित ‘बेफिक्रे’ चित्रपटाच्या शुटिंगसाठी ती दोन महिन्यांपासून पॅरिसमध्ये आहे. आता पॅरिसमध्ये एवढा वेळ घालवल्यावर कोणीही प्रेमात पडेल.
शुटिंगचे पॅक अप झाले की, वाणी हॉटेलवर जाऊन आराम करण्याऐवजी पॅरिस भ्रंमती करते. आयफेल टॉवर, लुव्र संग्राहलय यासारख्या जगप्रसिद्ध पर्यटन स्थळांबरोबरच ती रोडसाईड कॅफे, छोटेछोटे मार्केट, विविध रस्ते, जागा एक्स्प्लोर करत आहे.
नुकताच तिने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये ती पॅरिसमधील स्ट्रीट परफॉरमर्ससोबत इंटरअॅक्ट होताना दिसत आहे.
शुटिंगबरोबरच पर्यटन होतेय म्हटल्यावर वाणी सध्या जाम खूश आहे.