​वाणी म्हणतेय, ‘ इंतजार का मजा कुछ और होता है’ !

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2016 09:04 PM2016-11-20T21:04:35+5:302016-11-20T21:59:57+5:30

अभिनेत्री वाणी कपूर तब्बल तीन वर्षांनंतर ‘बेफिक्रे’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर येत आहे. आदित्य चोपडा यांनी मला थोडी वाट ...

The voice says, 'the wait of the wait is something else'! | ​वाणी म्हणतेय, ‘ इंतजार का मजा कुछ और होता है’ !

​वाणी म्हणतेय, ‘ इंतजार का मजा कुछ और होता है’ !

googlenewsNext
ong>अभिनेत्री वाणी कपूर तब्बल तीन वर्षांनंतर ‘बेफिक्रे’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर येत आहे. आदित्य चोपडा यांनी मला थोडी वाट पहा असे सांगितले होते, ते का? आता मला समजले आहे, असे सांगून ‘इंतजार का मजा कुछ और होता है असे वाणी कपूर म्हणाली. 

तीन वर्षांआधी सुशांत सिंग राजपूत याच्या सोबत ‘शुद्ध देसी रोमांस’ या चित्रपटातून वाणीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटनंतर वाणी कोणत्याच चित्रपटात दिसली नाही. यामुळे तिची इंडस्ट्रीमध्ये चर्चा होत नव्हती. मात्र एकाएकी ती आदित्य चोपडा यांच्या आगामी चित्रपटात दिसणार असल्याचे सांगण्यात आले. यामुळे ती चर्चेत आली.

वाणी ‘बेफिक्रे’बद्दल म्हणाली, मी एखाद्या चांगल्या चित्रपटाच्या प्रतिक्षेत होती. माझा दुसरा चित्रपट येण्यास उशीर झाला हे खरे आहे. मात्र, आदित्य चोपडा यांनी मला चांगल्या व प्रस्थापित करणाºया चित्रपटाची प्रतीक्षा कर असे सांगितले होते. त्यांचा सल्ला मी मनावर घेतला. आदित्य चोपडा यांनी मला ‘बेफिक्रे’मध्ये संधी दिली. हा चित्रपट तयार व्हायला दोन वर्षे लागली, उशीर होत आहे असे वाटत होते पण आता मी आनंदी आहे. 

वाणी कपूरची ‘बेफिक्रे’मध्ये एंट्री झाल्यामुळे तिला लॉटरी लागली अशी बॉलिवूडमध्ये चर्चा होती. आदित्य चोप्रा तब्बल आठ वर्षांनंतर एखाद्या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असल्याने यांच्या  चित्रपटात भूमिका मिळावी यासाठी अनेक अभिनेते व अभिनेत्री प्रयत्न करीत होते. यात शाहरुखचा देखील समावेश होता. मात्र बाजी रणवीर सिंग व वाणी कपूरने बाजी मारली. आदित्य चोपडा यांचा ‘बेफिक्रे’ या चित्रपटाकडे बॉलिवूडमधील नवा ट्रेन्ड म्हणून पाहिले जात आहे. यासोबतच दुबई इंटरनॅशनल फिल्म फे स्टिव्हलमध्ये 21 व्या शतकात बदलत जाणारे प्रेमाचे स्वरूप या विषयावर आधारित चित्रपट म्हणून‘बेफिक्रे’ प्रदर्शित केला जाणार आहे. 

आदित्य चोपडा यांचा बेफ्रिके या चित्रपटाकडे बॉलिवूडमधील नवा ट्रेन्ड म्हणून पाहिले जात आहे. यासोबतच दुबई इंटरनॅशनल फिल्म फे स्टिव्हलमध्ये 21 व्या शतकात बदलत जाणारे प्रेमाचे स्वरूप या विषयावर आधारित चित्रपट म्हणून बेफ्रिके प्रदर्शित केला जाणार आहे. 

Web Title: The voice says, 'the wait of the wait is something else'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.