मेगास्टार मोहनलाल दिसणार या बहुभाषिक चित्रपटात, वडिलांच्या भूमिकेत दाखवणार दबदबा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2022 03:39 PM2022-08-27T15:39:15+5:302022-08-27T15:43:44+5:30

साऊथ सुपरस्टार मोहनलाल यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच मेगास्टार एका बहुभाषिक चित्रपटात दिसणार आहे.

Vrushabha megastar Mohanlal is going to play lead role in multilingual-movie | मेगास्टार मोहनलाल दिसणार या बहुभाषिक चित्रपटात, वडिलांच्या भूमिकेत दाखवणार दबदबा

मेगास्टार मोहनलाल दिसणार या बहुभाषिक चित्रपटात, वडिलांच्या भूमिकेत दाखवणार दबदबा

googlenewsNext

साऊथ सुपरस्टार मोहनलाल यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच मेगास्टार एका बहुभाषिक चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव आहे- 'वृषभा'. एव्हीएस स्टुडिओच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती होणार आहे. AVS स्टुडिओने याची घोषणा केली आहे. रिपोर्ट्सनुसार हा चित्रपट वडील-मुलाच्या कथेवर आधारित असेल. चित्रपटाचे चित्रीकरण मल्याळम आणि तेलुगू भाषेत होणार आहे. त्याचवेळी, ते तामिळ, कन्नड आणि हिंदीमध्ये डब केले जाईल.

तेलुगू स्टारलाही कास्ट करण्याची तयारी
नंदा किशोर या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. रिपोर्ट्सनुसार, चित्रपटात प्रेम आणि बदला या भावना दाखवण्यात येणार आहेत. अनेक सुपरहिट मल्याळम चित्रपटांमध्ये आपली क्षमता सिद्ध करणारे मोहनलाल या चित्रपटात वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहेत.  निर्माते चित्रपटात मोहनलाल यांच्या मुलाच्या भूमिकेसाठी एका मोठ्या तेलगू स्टारला कास्ट करण्याची तयारी करत आहेत.


रिपोर्ट्सनुसार हा चित्रपट पुढील वर्षी मे महिन्यात रिलीज होणार आहे. AVS स्टुडिओजच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती अभिषेक व्यास, प्रवीर सिंग आणि श्याम सुंदर यांनी केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, चित्रपटाच्या स्क्रिप्टवर विशेष लक्ष दिले जात आहे. 

पाच वर्षांपासून सुरु आहे काम 
या चित्रपटाबद्दल मोहनलाल सांगतात की, स्क्रिप्ट ऐकून त्यांनी चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला. ते म्हणाले की, हा चित्रपट एका वडील-मुलाच्या जोडीवर आधारित आहे. 
 

Web Title: Vrushabha megastar Mohanlal is going to play lead role in multilingual-movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.