वहिदा रहमान यांच्या ‘रूपेरी’आठवणींनी सजली सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार सोहळ्याची रात्र!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2018 03:11 PM2018-03-23T15:11:36+5:302018-03-23T20:41:36+5:30

​गाईड, चौदहवी का चाँद, नीलकमल, पथ्थर के सनम, साहब बीबी और गुलाम यारख्या अजरामर चित्रपटांना आपल्या अभिनयाचा साज चढविणा-या ...

Waheeda Rehman's 'Imphal' celebrates the night of Sajal-sur Jyotsna National Music Award ceremony! | वहिदा रहमान यांच्या ‘रूपेरी’आठवणींनी सजली सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार सोहळ्याची रात्र!

वहिदा रहमान यांच्या ‘रूपेरी’आठवणींनी सजली सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार सोहळ्याची रात्र!

googlenewsNext
ाईड, चौदहवी का चाँद, नीलकमल, पथ्थर के सनम, साहब बीबी और गुलाम यारख्या अजरामर चित्रपटांना आपल्या अभिनयाचा साज चढविणा-या पद्मभूषण वहिदा रहमान त्यांच्या रुपेरी आयुष्याच्या आठवणींनी नागपुरकर  आज चांगलेच सुखावले. निमित्त होते लोकमत सखी मंचच्या संस्थापक आणि संगीतसाधक ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिनिमित्त लोकमत मीडिया ग्रुपतर्फे दिल्या जाणा-या सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार सोह्रळ्याचे. भावना सोमय्या यांनी वहिदा यांना बोलते केले. कोलकत्यात शूटींग सुरू असताना नाईट  शूटींग होते़ मी इंडस्ट्रीज एकदम नवे होते. थोडासाही ब्रेक मिळाला की,आईच्या मांडीवर डोके ठेवून झोपून जायचे. शॉट रेडी झाला की, मग असिस्टंट डायरेक्टर मला उठवायचे अन् मी शॉट द्यायचे. चित्रपट रिलीज झाल्यावर हेच शॉट्स मी पडद्यावर बघितले अन् मला हसू आले होते. मी तर सेटवर सतत झोपेत असायचे, तरिही इतकी सुंदर दिसतेय, असा विचार माझ्या मनात त्यावेळी आला होता. या एका आठवणीने वहिदा यांनी सुरुवात केली. मला फक्त देवावर विश्वास होता अन् माझे नशीब चांगले होते, त्यामुळेच मी अनेक चित्रपट करत गेले आणि इंडस्ट्रीत रमत गेले़, असे त्यांनी सांगितले.
गाईडच्यावेळी अनेकांना मला हा चित्रपट न करण्याचा सल्ला दिला होता. कारण यात माझी भूमिका नकारात्मक होती़ पण मला नेहमीच वेगळे करायचे होते़.नव्या भूमिका, नवे विषय स्वीकारण्याकडे माझा कल होता. गाईडची भूमिका नकारात्मक होती, असे मला आजही वाटत नाही, असे वहिदांनी सांगितले.
त्या काळात आम्ही ब-याच प्रतिकूल परिस्थितीत काम केले़ झाडाच्या मागे कॉस्च्युम बदलण्यापासून सगळे काही़ आजच्या काळात कलाकारांसाठी काम करणे बरेच सोपे झालेय. पण आजच्या कलाकारांपुढे अनेक नवी आव्हाने आहेत़ स्वत:ला सुंदर ठेवण्यापासून तर स्पर्धेत टिकण्यापर्यंत, असे वहिदा म्हणाल्या.
कडुनिंबाच्या झाडाला ‘हेरिटेज ट्री’चा दर्जा मिळावा,अशी मागणी त्यांनी सूर जोत्स्रा पुरस्कार सोहळ्याच्या व्यासपीठावरून पुढे रेटली.

Web Title: Waheeda Rehman's 'Imphal' celebrates the night of Sajal-sur Jyotsna National Music Award ceremony!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.