'केजीएफ २'च्या चाहत्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार, सुपरस्टार यशने केली शूटिंगला सुरूवात

By तेजल गावडे | Published: October 10, 2020 05:02 PM2020-10-10T17:02:12+5:302020-10-10T17:04:21+5:30

सुपरस्टार यशने केली 'केजीएफ २'च्या शूटिंगला सुरूवात

The wait for 'KGF 2' fans will end soon, Superstar Yash has started shooting | 'केजीएफ २'च्या चाहत्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार, सुपरस्टार यशने केली शूटिंगला सुरूवात

'केजीएफ २'च्या चाहत्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार, सुपरस्टार यशने केली शूटिंगला सुरूवात

googlenewsNext

कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर चित्रपट आणि चित्रीकरणासंबंधित सर्व गोष्टी थांबवण्यात आल्या होत्या मात्र, आता अनेकांनी सर्व सुरक्षा नियमांचे पालन करत पुन्हा एकदा कामाला सुरुवात केली आहे. केजीएफच्या टीमने देखील आपल्या अन्य कलाकारांसोबत चित्रपटाच्या बहुप्रतीक्षित सीक्वलच्या शूटिंगला पुन्हा सुरुवात केली आहे. लॉकडाऊनच्या काळात यशने कठोर मेहनत घेतली असून सेटवर वापसी करण्यासाठी तो खूप उत्सुक होता. आता त्याने पुन्हा काम सुरू केले असून तो सेटवर परतला आहे. याचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत यशने आपल्या चाहत्यांना माहिती दिली आहे. 

यशने हा फोटो पोस्ट करत लिहिले की, 'लाटांना थांबविता येत नाही, परंतु आपण पोहायला शिकू शकतो. बऱ्याच काळाच्या विश्रांतीनंतर रॉकीने पुन्हा एकदा पोहणे सुरू केले आहे.' 

'केजीएफ: चॅप्टर 1'मध्ये सुपरस्टार यशच्या विस्मयकारक प्रदर्शनाने थक्क झाल्यानंतर त्याचे चाहते 'केजीएफ: चॅप्टर 2' मध्ये त्यांच्या लाडक्या रॉकी भाईची एक झलक पाहण्यासाठी आतुर झाले आहेत. ‘केजीएफ: चॅप्टर 2’मध्ये यश मुख्य भूमिकेत असून त्याच्यासमोर अभिनेता संजय दत्त असणार आहे.

चित्रपटाच्या घोषणेपासूनच प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सुपरस्टार यशच्या प्रभावशाली परफॉर्मन्समुळे, केजीएफ: चॅप्टर 1 ला हिंदी, तमिळ आणि कन्नड चैनलवर आपल्या सॅटेलाइट प्रीमियरद्वारे अधिकतम टीआरपी प्राप्त झाली.

एवढेच नव्हे तर, ओटीटी प्लेटफॉर्मवर देखील केजीएफ: चॅप्टर 1ला चांगली दाद मिळाली ज्यामुळे चित्रपटाच्या पुढील भागासाठी प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढवल्या आहेत.

Web Title: The wait for 'KGF 2' fans will end soon, Superstar Yash has started shooting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.