Wait & Watch : ​आज ‘या’ मुहूर्ताला येणार ‘पद्मावती’चा ट्रेलर! केवळ काही तासांची प्रतीक्षा!!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2017 06:23 AM2017-10-09T06:23:50+5:302017-10-09T11:53:50+5:30

बस्स, आणखी काही तासांची प्रतीक्षा! होय, बरोबर आज दुपारी १ वाजून ०३ मिनिटाला ‘पद्मावती’ या बहुप्रतीक्षीत चित्रपटाचे ट्रेलर आपण ...

Wait & Watch: Padmavati's trailer for 'Muhurta' today! Just wait a few hours !! | Wait & Watch : ​आज ‘या’ मुहूर्ताला येणार ‘पद्मावती’चा ट्रेलर! केवळ काही तासांची प्रतीक्षा!!

Wait & Watch : ​आज ‘या’ मुहूर्ताला येणार ‘पद्मावती’चा ट्रेलर! केवळ काही तासांची प्रतीक्षा!!

googlenewsNext
्स, आणखी काही तासांची प्रतीक्षा! होय, बरोबर आज दुपारी १ वाजून ०३ मिनिटाला ‘पद्मावती’ या बहुप्रतीक्षीत चित्रपटाचे ट्रेलर आपण पाहू शकणार आहोत. दीपिका पादुकोण, रणवीर सिंग, शाहिद कपूर आदींनी आपआपल्या टिष्ट्वटर अकाऊंटवरून याची घोषणा केली.  दीपिका पादुकोण, रणवीर सिंग, शाहिद कपूर या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत.  



अलीकडे ‘पद्मावती’तील दीपिका पादुकोण, शाहिद कपूर आणि रणवीर सिंह यांचा फर्स्ट लूक जारी करण्यात आला होता. हा लूक चाहत्यांना प्रचंड भावला होता.  राणी पद्मावतीच्या भूमिकेतील मनमोहक दीपिका, राजा महारावल रतन सिंहच्या भूमिकेतील रूबाबदार शाहिद कपूर आणि अल्लाऊद्दीन खिल्जीच्या निगेटीव्ही शेडमध्ये असलेला रणवीर सिंह यांच्या चित्रपटातील लूकने प्रेक्षकांच्या अपेक्षा कमालीच्या उंचावल्या होत्या. तेव्हापासून चाहते ‘पद्मावती’च्या ट्रेलरकडे डोळे लावून बसले आहेत. पण आज काहीच तासांत प्रेक्षकांची ही प्रतीक्षा संपणार आहे.मध्यंतरी ‘पद्मावती’ची अख्खी टीम नाराज असल्याची बातमी आली होती. रणवीर सिंहचा लूक अधिकृतपणे जारी होण्याआधीच तो लिक झाल्यामुळे ही नाराजी होती.
खरे तर सुरूवातीपासून ‘पद्मावती’ वादात सापडला आहे. चित्रपटाचा फर्स्ट लूक जारी होताच, या वादाला पुन्हा एकदा हवा मिळाली आहे. ‘पद्मावती’त तथ्यांना जराही विकृत केले गेले तर आम्ही या चित्रपटाचे स्क्रिनिंग हाणून पाडू, असा इशारा  करणी सेनेने दिला आहे.  
 ‘पद्मावती’त राणी पद्मावतीच्या व्यक्तिरेखेचे चुकीचे चित्रण करण्यात आल्याचा आक्षेप घेत गत जानेवारीच्या अखेरिस करणी सेनेने राजस्थानच्या जयपूर नजिक जयगढ येथे ‘पद्मावती’या सेटवर   धिंगाणा घातला होता. यादरम्यान ‘पद्मावती’चे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना मारहाणही करण्यात आली होती. यानंतर ‘पद्मावती’चा सेट कोल्हापुरात हलवण्यात आला होता. पण  अलीकडे काही अज्ञात व्यक्तिंनी या सेटची तोडफोड करत त्याल आग लावण्याचा प्रयत्न केला होता. या पश्चात ‘पद्मावती’मध्ये काहीही आक्षेपार्ह असणार नाही. राणी पद्मावती हिच्या प्रतिष्ठेला धक्का लागेल, असेही काहीही पडद्यावर दाखवण्याचे आमचे प्रयत्न नाहीत, असे भन्साळी यांनी स्पष्ट केल्यानंतर हा वाद मिटला होता.पण कदाचित चित्रपट पाहिल्याशिवाय करणी सेनेचे समाधान होणार नाही, असे दिसतेय.

ALSO READ : ‘पद्मावती’ विरूद्ध ‘बाहुबली2’! होय, सामना अटळ!!
 

Web Title: Wait & Watch: Padmavati's trailer for 'Muhurta' today! Just wait a few hours !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.