वाजिद खानच्या पत्नीने व्यक्त केल्या इंटरकास्ट मॅरेजच्या वेदना, धर्म बदलण्यासाठी दिला त्रास!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2020 11:37 AM2020-11-29T11:37:54+5:302020-11-29T11:38:09+5:30
वाजिद खानच्या पत्नीने इन्स्टाग्राम हॅंडलवर एक अॅंटी कन्वर्जन लॉवर पोस्ट लिहिली आहे. इंटरकास्ट मॅरेजमुळे तिला काय वेदना, त्रास सहन करावा लागला याचा उल्लेख तिने यात केला आहे.
संगीतकार जोडी साजिद-वाजिदची जोडी नुकतीच तुटली. वाजिद खान यांचं नुकतंच निधन झालं. त्यांची पत्नी कमालरूख खान या वेदनेतून अजून बाहेर येऊ शकली नाही. यादरम्यान त्यांनी एक सोशल मीडिया अकाउंटवर एक इमोशनल पोस्ट लिहिली. यात त्यांनी पतीच्या परिवाराने धर्म बदलण्यासाठी कशाप्रकारे धमकावलं किंवा भिती दाखवली हे सांगितली आहे. कमालरूख ही जन्माने पारसी आहे.
वाजिद खानच्या पत्नीने इन्स्टाग्राम हॅंडलवर एक अॅंटी कन्वर्जन लॉवर पोस्ट लिहिली आहे. इंटरकास्ट मॅरेजमुळे तिला काय वेदना, त्रास सहन करावा लागला याचा उल्लेख तिने यात केला आहे. कमालरूखने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ती आणि वाजिद कॉलेजमध्ये सोबत होते. लग्नाआधी दोघे १० वर्षे सोबत होते. कमालरूख पारसी तर वाजिद मुस्लिम होता. दोघांनी प्रेमामुळे स्पेशल मॅरेज अॅक्टनुसार लग्न केल होतं.
कमालरूखने लिहिले की, माझी वाढ एका साधारण पारसी डेमोक्रॅटीक सिस्टीममध्ये झाला. विचारांचं स्वातंत्र आणि हेल्दी डिबेट होत होते. शिक्षणाला प्रोत्साहन दिलं जात होतं. पण लग्नानंतर हेच स्वातंत्र, शिक्षण आणि डेमोक्रॅटीक मूल्य माझ्या पतीच्या परिवारासाठी सर्वात मोठी समस्या बनले.
धर्म बदलल्याने वाजिदपासून दूर गेले
पोस्टमध्ये तिने लिहिले की, स्वतंत्र महिला आणि विचार तिच्या पतीच्या परिवाराला स्वीकार नव्हते. तिच्या धर्म न बदलण्याच्या निर्णयालाही त्यांनी चुकीच्या पद्धतीने बघितलं. कमालरूखने सांगितलं की, ती प्रत्येक धर्माचा सन्मान करते आणि प्रत्येक उत्सवात सहभागी होते. पण धर्म न बदलण्याच्या निर्णयाने तिच्यातील आणि वाजिदमधील अंतर वाढलं होतं. याचा परिणाम त्यांच्या पती-पत्नीच्या नात्यावर आणि मुलांवरही पडला.
कन्वर्जनसाठी वापरल्या वाईट पद्धती
कमालरूखने लिहिले की, माझा आत्मसन्मान याची परवानगी देत नव्हता की, आपल्या पती आणि त्याच्या परिवारासाठी मी इस्लाम कुबूल करण्यासाठी वाकावं. कन्वर्जनवर माझा व्यक्तिगत विश्वास नाही. तिने सांगितले की, मी अनेक वर्ष या भयानक विचाराचा मुकाबला करण्याचा प्रयत्न करत राहिले. याचा परिणाम असा झाला की, त्याच्या परिवाराने मला वेगळं पाडलं आणि कन्वर्जनसााठी धमकावलं, घाबरवलं. ज्यात घटस्फोटासाठी कोर्टात घेऊन जाण्याचाही समावेश होता.
पतीनंतरही त्रास होतोच आहे
कमालरूख खानने लिहिले की, वाजिद फारच टॅलेंटेड म्युझिशिअन आणि कंपोजर होता. मला आणि माझ्या मुलांना त्याची फार आठवण येते. त्याने आणखी काही वेळ आमच्या सोबत रहायला हवं असतं. तिने लिहिले की, तिच्या पतीच्या निधनानंतर त्याचा परिवार अजूनही त्रास देत आहे.